घरातील खिडक्या बदलतात नशीब, एक छोटी चूक वाढवू शकते अडचणी; होऊ शकत मोठं नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वास्तूशास्त्रानुसार घराच्या खिडक्या केवळ हवा आणि प्रकाशाचा स्रोत नसून त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करणाऱ्या मुख्य मार्ग मानल्या जातात. खिडक्यांची चुकीची दिशा किंवा स्थिती घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे, आर्थिक चणचण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते.
advertisement
advertisement
तुटलेल्या खिडक्यांचा धोका: खिडकीच्या काचा तुटलेल्या असल्यास त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. तुटलेल्या खिडक्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच, खिडकी उघडताना किंवा लावताना आवाज येत असेल, तर ते वास्तूदोष मानले जाते; अशा वेळी बिजागऱ्यांना तेल लावून तो आवाज बंद करावा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
साफसफाई आणि सजावट: खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवाव्यात. धुळीने माखलेल्या खिडक्यांमुळे प्रगतीत अडथळे येतात. सकाळी काही वेळ पूर्वेकडील खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून ताजी हवा आणि सूर्याचा प्रकाश घरात येईल. खिडकीत छोटी शोभेची रोपे किंवा सुगंधी फुले ठेवल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








