Summer Health Tips : उन्हाळ्यामध्ये शरीर राहील कूल, आहारात समावेश करा हे पदार्थ, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
उन्हाळ्यामध्ये शरीराचं मोठ्या प्रमाणामध्ये डिहायड्रेशन होतं. त्यामुळे आपली एनर्जी लेवल देखील कमी होते.
advertisement
advertisement
advertisement
टरबूजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी हे असतं. त्यामुळे टरबूज खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला हायड्रेट राहायला मदत होते. हे टरबूज तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. म्हणजेच तुम्ही त्या फोडीच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस करून पिऊ शकता. त्यासोबतच काकडीमध्ये देखील 98 टक्के पाण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे तुम्ही काकडी खायलाच हवी. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आहेत, असं आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
त्यासोबतच तुम्ही काकडी सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकता. नाहीतर काकडीचा रस करून सुद्धा तुम्ही पिऊ शकता. तसेच प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये पुदिना हा असतोच. पुदिना देखील हा शरीरासाठी चांगला असतो. कोणत्याही सरबतामध्ये हे पुदिनाची पाने टाकून जर तुम्ही प्यायले तर तुम्हाला मदत होते. त्यासोबतच आपल्या सर्वांच्या घरामध्ये ताक हे असते. ताक देखील तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा.
advertisement
उन्हाळ्यात जेवणामध्ये एक वाटी दही देखील तुम्ही खायलाच पाहिजे. तसंच नारळ पाणी देखील तुम्ही दररोज प्यायलाच हवं. तसेच बडीशेप आणि धने हे जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून पाणी प्यायले तरी सुद्धा तुम्हाला हायड्रेट राहायला मदत होते. एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धने जर तुम्ही खाल्ले तरी सुद्धा ते खूप फायद्याचे ठरते.
advertisement







