advertisement

'लाखात एक आमचा दादा'चा खतरनाक व्हिलन आता बनणार सज्जन हिरो, नव्या मालिकेत दमदार कमबॅक 

Last Updated:
लाखात एक आमचा दादा मालिकेतील खरतनाक खलनायक आता सज्ज हिरो बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या मालिकेत त्याची एन्ट्री झाली आहे.
1/9
मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराची स्वत:ची एक स्पेशलिटी असते. कोणी पॉझिटिव्ह रोलसाठी तर कोणी निगेटिव्ह रोलसाठी प्रसिद्ध असतात.

2/9
पण असे फार कमी कलाकार आहेत जे या दोन्ही भूमिका उत्तमरित्या निभावू शकतात आणि प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळी छाप पाडतात. 

3/9
झी मराठीवरील असाच एक अभिनेता, ज्याने आधी निगेटिव्ह रोलमध्ये सगळ्यांची मनं जिंकली. आता तो पॉझिटिव्ह रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्हीही पात्र वेगळी आहेत मात्र कलाकार एकच आहे. 

4/9
आपण बोलत आहोत अभिनेते गिरीश ओक यांच्याबद्दल. झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत आपली भूमिका गाजवल्यानंतर आता ते झी मराठीच्या नव्या मालिकेत दिसणार आहेत. 

5/9
'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतील व्यक्तिरेखेविषयी बोलताना गिरीश ओक म्हणाले,
'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतील व्यक्तिरेखेविषयी बोलताना गिरीश ओक म्हणाले, "'लाखात एक आमचा दादा' हि मालिका मी करत होतो त्यात माझी खलनायकाची भूमिका होती.  ती अतिशय निगेटिव्ह होती."
advertisement
6/9
 "अतिशय निर्दयी, गोर गरिबांचे हाल करणार, गरिबांचे शोषण करणारा, बायकांवर अत्याचार करणारा, पैसे लुबाडणारा, स्वतःच्या परिवाराला वाईट वागवणारा अश्या वाईट स्वभावाचा-वृत्तीचा व्यक्ती होता. ह्या सगळ्या पेक्षा आताची भुमिका हि खूपच चांगली आहे."

7/9
अभिनेते गिरीश ओक आता झी मराठीच्या 'दीपज्योती' या नव्या मालिकेत दिसणार आहेत. नव्या मालिकेबद्दल बोलताना ते म्हणाले,
अभिनेते गिरीश ओक आता झी मराठीच्या 'दीपज्योती' या नव्या मालिकेत दिसणार आहेत. नव्या मालिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, "माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे पुरुषोत्तम गायकवाड . पुरुषोत्तमची साड्यांची बरीच दुकानं आहेत, त्याचा साड्यांचा व्यापार आहे आणि तो त्यांनी शून्यातून उभा केलेला आहे. त्याने ही संपत्ती, व्यवसाय, साम्राज्य खूप मेहनतीने उभं केलेल आहे आणि आता मुल हे सगळं सांभाळतील, असं त्याला वाटतंय."
advertisement
8/9
पुरुषोत्तम अतिशय तत्वनिष्ठ, सज्जन, कुठलाही वाईट व्यवहार न करणारा, मेहनतीने कमावणारा, सचोटीने वागणारा, लोकांना मदत करणारा, हळव्या मनाचा अशी त्याच्या भूमिकेची पार्श्वभूमी आहे. त्याची बायको जिवंत नाही, पण त्याच बायकोवर अतिशय प्रेम आहे .

9/9
गिरीश ओक यांची 'दीपज्योती' मधील ही सकारात्मक भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. 'दीपज्योती' ही मालिका 13 एप्रिलपासून दररोज रात्री 8 वाजता झी मराठीवर टेलिकास्ट होणार आहे. 

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement