advertisement

नांदेडमध्ये पुन्हा रक्तरंजित राडा, 4 जणांवर तलवारीने हल्ला, नगरसेवकावर गंभीर आरोप

Last Updated:

शुक्रवारी घडलेल्या गँगवॉरनंतर नांदेडमध्ये पाच हत्येच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असताना आता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात पुन्हा एकदा रक्तरंजित राडा झाला आहे.

नांदेडमध्ये रक्तरंजित राडा, चौघे जखमी
नांदेडमध्ये रक्तरंजित राडा, चौघे जखमी
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: मागील काही दिवसांपासून नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. गेल्या शुक्रवारी घडलेल्या गँगवॉरनंतर नांदेडमध्ये पाच हत्येच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असताना आता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात पुन्हा एकदा रक्तरंजित राडा झाला आहे. बुधवारी दुपारी दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीने संपूर्ण बाजारपेठ हादरली आहे. राजकीय वैमनस्य आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या या राड्यात चक्क तलवारींचा वापर करण्यात आला असून, यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

हिमायतनगर येथील वर्दळीच्या बाजारपेठेतील उमर चौकात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून दोन गटांत राजकीय मुद्द्यांवरून खटके उडत होते. आज या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर एकमेकांवर लाठ्याकाठ्या आणि धारदार तलवारींनी हल्ला चढवण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात शेख शाकीर, शेख रईस आणि शेख कलीम यांच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी झाला.
advertisement

दोघांची प्रकृती चिंताजनक

जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शेख रईस आणि शेख कलीम या दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथील विष्णूपुरी शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

विद्यमान नगरसेवकावर आरोप

या घटनेत एका गटाने गंभीर आरोप केला आहे. हा राडा केवळ वैयक्तिक कारणातून नसून यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा करण्यात येत आहे. या हाणामारीत एका विद्यमान नगरसेवकाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी तत्काळ उमर चौकात धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात आणि बाजारपेठ भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नांदेडमध्ये पुन्हा रक्तरंजित राडा, 4 जणांवर तलवारीने हल्ला, नगरसेवकावर गंभीर आरोप
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement