advertisement

Health Care : तिशीच्या टप्प्यावर व्हा अलर्ट, आरोग्याशी संबंधित चाचण्या नक्की करुन घ्या, धोका टाळा

Last Updated:

वयाच्या तिशीनंतर शरीरात विविध समस्या जाणवू लागतात. प्रीडायबिटीस, फॅटी लिव्हर आणि थायरॉईड असंतुलन यांसारखे अनेक आजार या वयापासून जाणवतात. हे आजार हळूहळू पसरतात आणि याची कोणतीही लक्षणं दिसतीलच असं नाही. भारत सरकारच्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. लक्षणं दिसतात, तेव्हा उपचार दीर्घ आणि गुंतागुंतीचे असू शकतात. त्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीनं तिशीचं वय अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण याच वेळी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करणं सर्वात प्रभावी ठरतं.

News18
News18
मुंबई : तिशीचा टप्पा म्हणजे वैयक्तिक आणि करियरमधला महत्त्वाचा काळ. सध्याचं आयुष्य अधिक आव्हानात्मक बनत चाललंय.
तिशीपर्यंत अनेकजण करिअर आणि जबाबदाऱ्यांमधे गुंतलेले असतात, पण यामुळे अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. सर्व काही सामान्य वाटत असलं तरी, याच वयात अनेक गंभीर आजार हळूहळू बळावतात. तज्ज्ञांच्या मते, या टप्प्यात नियमित आरोग्य तपासणी लवकर सुरू केली, तर या समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणं शक्य होतं.
वयाच्या तिशीनंतर शरीरात विविध समस्या जाणवू लागतात. प्रीडायबिटीस, फॅटी लिव्हर आणि थायरॉईड असंतुलन यांसारखे अनेक आजार या वयापासून जाणवतात. हे आजार हळूहळू पसरतात आणि याची कोणतीही लक्षणं दिसतीलच असं नाही. भारत सरकारच्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. लक्षणं दिसतात, तेव्हा उपचार दीर्घ आणि गुंतागुंतीचे असू शकतात. त्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीनं तिशीचं वय अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण याच वेळी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करणं सर्वात प्रभावी ठरतं.
advertisement
रक्त तपासणी - तिशीच्या टप्प्यावर रक्तातील साखर आणि HbA1c सारख्या चाचण्या करुन घ्या. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आहे का, ते कळू शकेल. HbA1c चाचणी मागील तीन महिन्यांतील साखरेची सरासरी पातळी दर्शवते, ज्यामुळे मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं ओळखणं सोपं होतं.
advertisement
त्याचप्रमाणे, लिपिड प्रोफाइल अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातून केवळ कोलेस्ट्रॉलच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्याच्या इतर अनेक पैलूंबद्दलही माहिती मिळते. कधीकधी, एकूण कोलेस्ट्रॉल सामान्य असलं तरी, ट्रायग्लिसराइड्स किंवा एचडीएल कोलेस्ट्रॉलमधील असंतुलनामुळे हृदयाचा धोका वाढू शकतो.
फॅटी लिव्हर - फॅटी लिव्हर ही समस्या, मद्यपान न करणाऱ्या लोकांमधेही झपाट्यानं वाढते आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, यामुळे कोणतीही लक्षणीय लक्षणं दिसू शकत नाहीत, पण कालांतरानं ती गंभीर होऊ शकतात.
advertisement
बीएमआय (BMI) सोबतच, शरीरातील चरबी आणि स्नायू यांचं प्रमाण समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे.
कधीकधी एखादी व्यक्ती बाहेरून सुदृढ दिसते, पण शरीरात लपलेली चरबी भविष्यात गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते.
या गोष्टी तपासणं महत्त्वाचं -
advertisement
हृदय आणि थायरॉईडच्या चाचण्याही वेळेवर केल्या पाहिजेत. कधीकधी सुरुवातीच्या टप्प्यात सूज किंवा थायरॉईडच्या समस्यांची लक्षणं दिसत नाहीत, पण नंतर त्याचा परिणाम ऊर्जा, मनःस्थिती आणि चयापचय क्रियेवर होऊ शकतो.
याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डी, बी 12 आणि लोहाची कमतरता याकडे दुर्लक्ष करु नका. अनेकदा थकवा किंवा तणाव म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण नियमित आरोग्य तपासणीमुळे या कमतरता लवकर ओळखण्यास आणि दूर करण्यास मदत होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Care : तिशीच्या टप्प्यावर व्हा अलर्ट, आरोग्याशी संबंधित चाचण्या नक्की करुन घ्या, धोका टाळा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement