Smriti Mandhana : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील व्हिडीओमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana Palash Muchhal Patch Up Rumours : टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत का? असा सवाल विचारला जातोय. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.
Smriti Mandhana Father With Palash Muchhal Sister : लग्नाच्या फक्त एक दिवस आधी टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या मैत्रीच्या नात्यात देखील मिठाचा खडा पडला अन् पाच वर्षाच्या प्रेमाला वादाची किनार लाभली. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित झाला होता. लग्नापूर्वीचे सर्व विधी पूर्ण झाले होते, मात्र मुख्य सोहळ्याच्या वेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, अशी माहिती समोर आली. परंतू पलाश आणि स्मृती यांच्या नातात्यात कटुता निर्माण झाली होती. अशातच आता दोघांमध्ये पुन्हा पॅचअप झालंय का? असा सवाल विचारला जातोय.
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास अन् पलकची भेट
पलाश आणि स्मृती पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या व्हिडिओमुळे स्मृती आणि पलाशच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालं आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना हे मुंबईतील एका पॉश रेस्टॉरंटबाहेर दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल व तिचा पती मिथुन देखील स्पॉट झाले. या व्हिडिओमध्ये पलक मुच्छलने स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळालं.
advertisement
advertisement
दोघांमधील जुने वाद मिटले
दरम्यान, दोन्ही कुटुंबांमधील ही जवळीक पाहून त्यांच्यातील जुने वाद मिटले असून आता पुन्हा एकदा लग्नाची बोलणी सुरू झाल्याचे तर्क लावले जात आहेत. सोशल मीडियावर मात्र, या व्हिडीओमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. "सर्व खरं आहे का? पुन्हा लग्न होणार का?", तर काहींनी हा जुना व्हिडिओ असावा असा संशय व्यक्त केला आहे. "पलाशला दुसरी संधी दिल्याबद्दल स्मृती तुझे आभार," तर दुसऱ्याने लिहिले, "पलाश कसाही असला तरी पलक खूप चांगली आहे", असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
advertisement
पलाशला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं?
स्मृती मानधनाचा जवळचा मित्र आणि अभिनेता-निर्माता विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. पलाशला दुसऱ्या एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडण्यात आले होते, असा खळबळजनक दावा माने याने केला आहे. इतकेच नाही तर, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पलाशला चोप दिला होता, असंही त्याने एका मुलाखतीत म्हटलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 2:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील व्हिडीओमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण!









