Summer Care : कडक उन्हाळ्यात क्रंची मंची सॅलड, रंगीबेरंगी सॅलड पाहून वाढेल भूक, खाऊन मन होईल तृप्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
संध्याकाळच्या थोड्याशा भुकेसाठी कलिंगड आणि मक्याचे दाणे वापरुन एक पौष्टिक खाऊ बनवता येईल. आरोग्यदायी आणि चविष्ट असं टरबूज-मक्याचं सॅलड नक्की करुन पाहा.
मुंबई : उष्णता आणि आर्द्रतेमुळे काही वेळा पूर्ण जेवण नको वाटतं. जड आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं अनेकदा या हवेत पोटात जडपणा जाणवतो. यासाठी हलका पण सकस आहार खायचा असेल तर एक चांगला पर्याय आहे.
संध्याकाळच्या थोड्याशा भुकेसाठी कलिंगड आणि मक्याचे दाणे वापरुन एक पौष्टिक खाऊ बनवता येईल. आरोग्यदायी आणि चविष्ट असं टरबूज-मक्याचं सॅलड नक्की करुन पाहा.
कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे उन्हाळ्यात होणारं डिहायड्रेशन टाळता येतं आणि पोट थंड राहतं. उकडलेल्या गोड मक्यामुळे सॅलडला थोडी कुरकुरीत, किंचित गोड चव येते. रसरशीत कलिंगड आणि कुरकुरीत मका एकत्र आल्यानं याची रंगत वाढते.
advertisement
सॅलडसाठी लागणारं साहित्य - दोन कप कलिंगड, कलिंगडाच्या बिया काढून, बारीक चिरुन घ्या. पुदिन्याची पानं - 8-10, एक छोटा चमचा लिंबाचा रस, काळं मीठ आणि चाट मसाला चवीनुसार वापरा. चिमूटभर काळी मिरी पूड.
सॅलडची एक सोपी पाककृती - एका भांड्यात टरबुजाचे तुकडे आणि उकडलेले मक्याचे दाणे एकत्र करा. त्यात बारीक चिरलेला ताजा पुदिना घाला. पुदिना हा या सॅलडचा मुख्य घटक आहे, यामुळे उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळतो.
advertisement
चवीनुसार काळं मीठ, चाट मसाला, चिमूटभर काळी मिरी पूड आणि ताज्या लिंबाचा रस घाला. चमच्यानं सगळं साहित्य हळुवारपणे एकत्र करा, जेणेकरून कलिंगडाचे तुकडे तुटणार नाहीत आणि सर्व मसाले व्यवस्थित एकजीव होतील.
advertisement
तयार झालं की सॅलड फ्रिजमधे ठेवा. ते तयार झाल्यावर, पंधरा-वीस मिनिटं फ्रिजमधे ठेवा. थंड झाल्यावर, एका भांड्यात काढून घ्या आणि दोन तीन मिनिटांनी खा. यात तुम्ही काकडीचे बारीक तुकडेही टाकू शकता. टरबूज-मक्याचं सॅलडमुळे कडक उन्हाळ्यात फ्रेश वाटेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 1:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : कडक उन्हाळ्यात क्रंची मंची सॅलड, रंगीबेरंगी सॅलड पाहून वाढेल भूक, खाऊन मन होईल तृप्त








