Yashasvi Jaiswal : 240 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, MI विरुद्ध खेळताना जयस्वालची स्पेशल 'सेंच्युरी', कुणाच्याच लक्षात आलं नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yashasvi Jaiswal Complete 100 sixes : विशेष कामगिरीमुळे जयस्वाल राजस्थानच्या एका खास क्लबमध्ये सामील झाला असून अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे.
Mumbai Indians vs Rajasthan Royals : आयपीएलच्या 13 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पावसामुळे 11-11 ओव्हरचा सामना खेळवला गेला होता. राजस्थानने 150 धावांचं आव्हान पलटणसमोर ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईची टीम 123 रन्सच करू शकली. मुंबईविरुद्ध युवा छावा वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी 5 ओव्हरमध्ये 80 धावा करत वादळी सुरुवात केली. यावेळी जयस्वालने स्पेशल सेंच्युरी देखील पूर्ण केली आहे.
अशी कामगिरी करणारा चौथा खेळाडू ठरला
या खेळीदरम्यान त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना 100 सिक्स पूर्ण करण्याचा पराक्रम केला. या विशेष कामगिरीमुळे तो राजस्थानच्या एका खास क्लबमध्ये सामील झाला असून अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. या लिस्टमध्ये संजू सॅमसन 192 सिक्ससह टॉपवर आहे, तर जोस बटलरने 135 आणि शेन वॉटसनने 109 सिक्स मारले आहेत.
advertisement
77 रन्सची वादळी इनिंग
पावसामुळे झालेल्या 11 ओव्हरच्या या चुरशीच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने स्कोअरबोर्डवर 150 रन्सचा डोंगर उभा केला. युवा बॅटर वैभव सूर्यवंशी 14 बॉल्समध्ये 39 रन्स करून आऊट झाला, पण यशस्वी जयस्वालने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. जयस्वालने केवळ 32 बॉल्समध्ये 77 रन्सची वादळी इनिंग खेळली. जयस्वालने 240 च्या स्ट्राईक रेटने मुंबईचा चोपलं.
advertisement
बुमराहच्या पहिल्याच बॉलवर शानदार सिक्स
यशस्वी जयस्वालने जरी सर्वाधिक रन्स केले असले, तरी 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज बॉलरचा सामना करताना वैभवने जराही भीती न दाखवता बुमराहच्या पहिल्याच बॉलवर शानदार सिक्स मारला. हे पाहून स्वतः बुमराहलाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ओपनिंग जोडीने दाखवलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचे बॉलिंग लाईनअप पूर्णपणे विखुरलेले पहायला मिळालं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 1:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : 240 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, MI विरुद्ध खेळताना जयस्वालची स्पेशल 'सेंच्युरी', कुणाच्याच लक्षात आलं नाही!








