advertisement

एक लिटर कच्च्या तेलातून किती लिटर पेट्रोल निघतं? याची प्रोसेस काय? घ्या जाणून

Last Updated:
Crude Oil Refining: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. यासोबतच एलपीजी गॅससारखाच याचाही तुटवडा निर्माण होणार का अशीही लोकांमध्ये भीती आहे. दरम्यान एक लिटर कच्च्या तेलातून किती पेट्रोल निघतं चला पाहूया.
1/9
Petrol Production from Crude Oil: सध्या आखाती देशांमध्ये युद्धाचं वातावरण आहे. या तापलेल्या युद्धाच्या झळा या भारतापर्यंत पोहोचत आहेत. कारण इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजवर कंट्रोल केला आणि यामुळे या समुद्री मार्गाने कच्चा तेल आणि गॅस आणणाऱ्या जहाजांना वाहतूक करणं कठीण झालंय.

2/9
युद्धामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय. जगभरात कच्चे तेल आणि गॅसच्या किंमतीत वाढ झालीये. आजच्या काळात कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल खुप महत्वाचे आहे. यामुळे आपलं पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इतर अनेक गोष्टी तयार होतात. कच्चे तेल जमिनीच्या आतून काढलं जातं. हे थेट वापरलं जात नाही. ते रिफायनरीमध्ये स्वच्छ करुन पेट्रोल-डिझेल काढलं जातं. चला जाणून घेऊया 1 लिटर कच्च्या तेलातून किती पेट्रोल निघतं.

3/9
यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्टनुसार, कच्चे तेल हे अनेक प्रकारच्या तेलांचं मिश्रण असतं. यात लहान-मोठे कार्बनचे कण असतात. हे कण वेगवेगळ्या तापमाणावर उकळले जातात. रिफायनरीमध्ये ते वेगळे करण्यासाठी आंशिक आसवन म्हणजेच फॅक्शनल डिस्टिलेशन नावाच्या प्रक्रियेचा वापर केला जातो. ही प्रोसेस खुप मोठ्या टॉवरसारख्या मशीनमध्ये केली जाते.

4/9
सर्वात आधी कच्चे तेल खुप गरम केले जाते. ते 400 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानावर गरम करुन वाफेत रुपांतरीत केलं जातं. ही वाफ एका उंच टॉवरमध्ये वर जाते. टॉवरच्याखालचा भाग गरम असतो आणि वरचा भाग गार असतो. वाफ जसजशी वर जाते. ती गार होते. लहान कणाचे तेल पहिले गार होऊन तरल बनतात. हे तेलाप्रमाणेच असतात. म्हणजेच ते पेट्रोल असतं. मध्यम आकाराचे कण हे केरोसिन बनतात. मोठे कण खाली राहतात आणि डिझेल बनतात.

5/9
एक लिटर कच्च्या तेलातून किती पेट्रोल निघतं? : अमेरिकन ऊर्जा विभागानुसार, एक बॅरल क्च्या तेलात जवळपास 159 लिटर कच्चे तेल असते. हे जवळपास 19-20 गॅलन पेट्रोल तयार होतं. हे जवळपास 72-76 लिटर पेट्रोल असतं. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झाल्यास, एक लिटर कच्च्या तेलातून सरासरी 0.45 ते 0.48 लिटर पेट्रोल निघतं. ही संख्या रिफायनरी आणि कच्च्या तेलाची क्वालिटीवर थोडा कमी जास्त होऊ शकते.

6/9
डीझेल थोडं जड तेल आहे. हे टॉवरच्या मधल्या भागातून निघते. एक बॅरल कच्च्या तेलातून जवळपास 11-12 गॅलन म्हणजेच 42-45 लिटर डिझेल तयार होते. सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल तर एक लिटर कच्च्या तेलातून जवळपास 0.26 ते 0.28 लिटर डिझेल मिळतं. डिझेल ट्रक, बस आणि मशीनसाठी वापरलं जातं. हे जड तेल मानलं जातं.

7/9
कच्च्या तेलातून किती केरोसिन निघतं? : केरोसिनही कच्च्या तेलाच्या रिफायनिंग प्रोसेसमधून निघतं. एक बॅरलमधून जवळपास 4-5 गॅलन केरोसिन किंवा जेट फ्यूल टाइपचं तेल मिळतं. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झाल्यास, एक लिटर कच्च्या तेलातून जवळपास 0.10 ते 0.12 लिटर केरोसिन निघतं. हे स्वयंपाक घरात गॅस स्टोव्ह किंवा लँपमध्ये वापरलं जातं. रिफानरीमध्ये डिस्टिलेशननंतर काही अतिरिक्त प्रक्रिया होतात. जड तेल जमा करुन जास्त पेट्रोल आणि डिझेल तयार केलं जातं. सल्फर सारख्या खराब तत्व काढून स्वच्छता केली जाते. यामुळे प्रोडक्ट स्वच्छ आणि इन्व्हर्मेंट फ्रेंडली बनते.

8/9
कच्च्या तेलातून आणखी काय निघतं? : कच्च्या तेलातून फक्त इंधनच निघत नाही. तर प्लास्टिक, औषधं, रस्ते तयार करण्यासाठी डांबरही निघतं. रिफायनिंगमध्ये प्रोडक्टचं व्हॉल्यूम कच्च्या तेलापेक्षा जास्त असते. कारण प्रोसेसिंगमध्ये व्हॉल्यूम वाढते. प्रोसेसिंग दरम्यान कच्च्या तेलात काही केमिकल्स किंवा इतर गोष्टीही मिसळल्या जातात. ज्यामुळे जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल निघतं.

9/9
भारतात अनेक रिफायनरी हे काम करतात. आपला जास्तीत जास्त कच्चे तेल हे परदेशातून येतं आणि देशात ते रिफाइन केलं जातं. कच्चे तेल गल्फ देशांमध्ये जास्त निघतं आणि भारतातील जास्तीत जास्त कच्चे तेल स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या रस्त्याने येतं. अमेरिका-इस्रायल आणि इराण दरम्यान युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठ्यावर परिणाम झालाय. ज्याचा परिणाम जगभरात पाहयाला मिळतोय.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement