advertisement

Masala Tak Recipe : शरीरासाठी फायदेशीर, उन्हाळ्यात थंडगार मसाला ताक बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

आज आपण बघणार आहोत की घरी तुम्ही एकदम छान टेस्टी असा मसाला ताक कसे करू शकता.

+
उन्हाळ्यासाठी

उन्हाळ्यासाठी घरीच करा मसाला ताक 

‎छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटले की आपण सर्वजण थंडगार पदार्थ घेत असतो, त्यापैकीच एक थंड पेय म्हणजे ताक. उन्हाळ्यामध्ये ताक पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. तर आज आपण बघणार आहोत की घरी तुम्ही एकदम छान टेस्टी असा मसाला ताक कसे करू शकता. याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजून दहा मिनिटांमध्ये तयार होते.
मसाला ताकसाठी लागणारे साहित्य
एक ग्लास भरून ताक, बर्फाचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, चाट मसाला, जिरेपूड, अद्रकाचा तुकडा, मीठ, काळे मीठ एवढे साहित्य याकरिता लागणार आहे.
मसाला ताक कृती 
सर्वप्रथम मिक्सरच्या जारमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये तीन-चार पुदिन्याची पाने टाकायची आहेत, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, थोडासा अद्रकाचा तुकडा, नंतर मीठ टाकायचे आहे, काळे मीठ टाकायचे आहे आणि दोन बर्फाचे तुकडे टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ताकाचा मसाला बनवून तयार होतो. आता आपण जे ग्लास भरून ताक घेतले आहे, त्यामध्ये साधारणपणे एक चमचा भरून हा मसाला टाकायचा आहे आणि एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे. आणि वरून गार्निशिंगसाठी थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. हवा असेल तर तुम्ही यामध्ये बर्फ देखील टाकू शकता.
advertisement
अशा सोप्या आणि झटपट पद्धतीने हे मसाला ताक बनवून तयार होते. तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील खूपच आवडेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Masala Tak Recipe : शरीरासाठी फायदेशीर, उन्हाळ्यात थंडगार मसाला ताक बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement