advertisement

जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरात दडलेली आहेत गूढ रहस्य, भारतात नाही मग कुठे आहे 'हे' मंदिर?

Last Updated:
हिंदू धर्माचा इतिहास सर्वात जुना आहे. हा धर्म वैदिक काळापूर्वीचा मानला जातो, कारण वेदिक काळ आणि वेदांच्या रचनेचा कालखंड हा भिन्न मानला जातो.भारतातील सुमारे 80 टक्के लोक हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात आणि याच कारणामुळे भारतात अनेक हिंदू मंदिरे आहेत.
1/7
हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना आणि प्राचीन आहे धर्म मानला जातो. हिंदू धर्माचा इतिहास सर्वात जुना आहे. हा धर्म वैदिक काळापूर्वीचा मानला जातो, कारण वेदिक काळ आणि वेदांच्या रचनेचा कालखंड हा भिन्न मानला जातो.भारतातील सुमारे 80 टक्के लोक हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात आणि याच कारणामुळे भारतात अनेक हिंदू मंदिरे आहेत.

2/7
देशात असे कोणतेच गाव किंवा शहर सापडणार नाही जिथे मंदिर नसेल. पण असे असूनही, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नाही तर कंबोडियामध्ये आहे. या मंदिराचे नाव अंगकोरवट मंदिर आहे. हे मंदिर अंगकोर, कंबोडिया येथे आहे. ज्याचे जुने नाव ‘यशोधरपूर’ होते. हे 12 व्या शतकात खमेर राजवंशातील सम्राट सूर्यवर्मन दोनच्या कारकिर्दीत बांधले गेले होते. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी बहुतेक शिवमंदिरेच बांधली होती पण हे एक विष्णू मंदिर आहे.

3/7
अंगकोरवट हे जगातील अशा मोजक्या मंदिरांपैकी एक आहे ज्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. साधारणपणे हिंदू मंदिरे पूर्वेकडे तोंड करून असतात. विशेष म्हणजे, वर्षातून दोनदा 'इक्विनॉक्स' दिवशी सूर्य बरोबर मंदिराच्या मध्यवर्ती शिखराच्या मागून उगवताना दिसतो, जे त्या काळातील खगोलशास्त्रीय ज्ञानाचा पुरावा आहे.

4/7
हे मंदिर 12 व्या शतकाच्या सुरुवातीला राजा सूर्यवर्मन द्वितीय याने भगवान विष्णूला समर्पित म्हणून बांधले होते. मात्र, 13 व्या शतकाच्या शेवटी हे मंदिर हळूहळू बौद्ध मंदिरामध्ये रूपांतरित झाले. आजही येथे हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही परंपरांचा संगम पाहायला मिळतो. मंदिराच्या रचनेत पाच उंच शिखरे आहेत, जी हिंदू पौराणिक कथेतील देवतांचे निवासस्थान असलेल्या 'मेरू' पर्वताचे प्रतीक मानली जातात. मंदिराभोवती असलेली अथांग पाण्याची दरी ही मेरू पर्वताभोवती असलेल्या क्षीरसागराचे प्रतीक आहे.

5/7
मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि पुराणांमधील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. यात देव आणि दानवांनी वासुकी नागाच्या साहाय्याने केलेले 'समुद्रमंथन' हे जगातील सर्वात मोठे आणि बारकाईने केलेले कोरीव काम मानले जाते. येथील अप्सरांच्या 1500 पेक्षा जास्त मूर्ती प्रत्येकी वेगळ्या केशरचनेत आहेत.

6/7
हे भव्य मंदिर केवळ 35-40 वर्षांत पूर्ण झाले होते. यासाठी वापरलेले 5 दशलक्ष टन पेक्षा जास्त वाळूचे दगड 50 किमी दूर असलेल्या डोंगरावरून आणले गेले होते. शास्त्रज्ञांच्या मते, हे दगड कालव्यांच्या साहाय्याने वाहून आणले असावेत, परंतु इतके दगड इतक्या अचूकपणे कसे जोडले गेले, हे आजही एक रहस्य आहे.

7/7
हे मंदिर कंबोडियासाठी इतके महत्त्वाचे आहे की, त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर या मंदिराचे चित्र आहे. जगातील कोणत्याही देशाच्या ध्वजावर अशा प्रकारे एका हिंदू मंदिराची प्रतिकृती असणे ही एकमेव घटना आहे. 1992 मध्ये 'युनेस्को'ने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement