मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व -
संपूर्ण भारतात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो. हिंदू धर्मात हा एक पुण्यपूर्ण दिवस मानला जातो. मकर संक्राती ही जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक मानली जाते. या दिवशी तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. तीळ आणि गुळाचे या सणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
advertisement
मकर संक्रांती 2025 तिखी आणि शुभ मुहूर्त -
यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. सूर्योदयानंतर सकाळी 09:03 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. या दिवसाचा शुभ मुहूर्त सकाळी 08:40 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल, यावेळात गंगाजलाने पवित्र स्नान करणे आणि दान देणे यांचे महत्त्व आहे. याशिवाय महापुण्यकाळ मुहूर्त 08:40 ते 09:04 पर्यंत असेल. या काळात सूर्यदेवाला विशेष प्रार्थना आणि अर्घ्य अर्पण करून पुण्य प्राप्त होते.
मकर संक्रांत पूजा विधी -
1. सकाळी उठणे: मकर संक्रांतीच्या पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
2. घराची स्वच्छता: पूजास्थळ स्वच्छ करा, घराच्या पवित्र ठिकाणी दिवा लावा.
3. पवित्र नदीत स्नान करणे: शक्य असल्यास गंगा, यमुना किंवा त्रिवेणी सारख्या पवित्र नदीत स्नान करा.
4. सूर्यदेवाला जल अर्पण करा: स्नान केल्यानंतर सूर्य देवाला जल अर्पण करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.
5. मंत्रांचा जप करा आणि दान करा: सूर्य मंत्राचा जप करा आणि तीळ, गूळ किंवा कपडे दान करा.
संकट टळलं! 'या' राशीच्या व्यक्तींसाठी 13 जानेवारीची दुपार, संध्याकाळ, रात्र सुखद
मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे महत्त्व -
मकर संक्रांतीला दानधर्माचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, गूळ, कपडे किंवा इतर वस्तू दान केल्याने पुण्य मिळते. दान केल्याशिवाय मकर संक्रांतीचे पूर्ण फायदे मिळू शकत नाहीत. विशेषतः तीळ आणि गूळ दान केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
वाईट काळ भयंकर होता! या राशींचे आता नशीब पालटणार; मंगळ-शुक्र भरभरून देणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)