TRENDING:

Astro Tips: देव गण, मनुष्य गण, राक्षस गण! गणानुसार व्यक्तीमध्ये असे गुण-दोष आढळतात

Last Updated:

Marathi Astro Tips: ज्योतिषशास्त्रात 3 गणांबद्दल सांगण्यात आलं आहे. पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव, वैशिष्ट्य आणि दोष यांची माहिती सांगतात. त्यावरून ज्योतिषतज्ज्ञ विविध माहिती देऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कोणता व्यक्ती कोणत्या गणाचा आहे, हे त्याच्या पत्रिकेवरून समजते. त्यानुसार व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. पत्रिकेतील गण विशेषत: लग्नाच्यावेळी पाहिले जातात. लग्नासाठी तयार केलेल्या बायोडाटावर गणांचा उल्लेख असतो. ज्योतिषशास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या 3 गणांबद्दल सांगण्यात आलं आहे. पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव, वैशिष्ट्य आणि दोष यांची माहिती सांगतात. त्यावरून ज्योतिषतज्ज्ञ विविध माहिती देऊ शकतात.
Astro Tips: देव गण, मनुष्य गण, राक्षस गण! गणानुसार व्यक्तीमध्ये असे गुण-दोष आढळतात
Astro Tips: देव गण, मनुष्य गण, राक्षस गण! गणानुसार व्यक्तीमध्ये असे गुण-दोष आढळतात
advertisement

हे 3 गण म्हणजे देवगण, मनुष्य गण आणि राक्षस गण. राक्षस गण आहे म्हटल्यावर अनेकाच्या मनात राक्षसाची प्रतिमा येते. राक्षस गणातील लोकांबद्दल वाईट मत तयार केले जाते, पण तसं असतंच असं नाही. देव गण हा तीन गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो, पण तिन्ही गणांचे स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण-दोष आढळतात.

advertisement

गण प्रकार आणि वैशिष्ट्य

देव गण

ज्योतिषांच्या मते देव गणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात. या लोकांमध्ये देवांच्या प्रती गुण असतात. हे लोक चांगले वागणारे, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत, कोमल मनाचे, दयाळू, बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात. हे लोकं धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात. हे लोकं नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात.

advertisement

मनुष्य गण 

ज्योतिषशास्त्रानुसार, मानव गणाची लोकं मेहनती मानली जातात. ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमावतात. जीवनात सन्मान मिळवतात. हे लोकं अतिशय काळजीपूर्वक कार्य करतात.

मकर संक्रांतीला आज घरी आणाव्या या 5 वस्तू, कुटुंबावार धनदेवतेची राहते कृपा

राक्षस गण

राक्षस गणाचे लोक नकारात्मक विचारांचे असू शकतात. पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात. राक्षस गणाच्या लोकांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात. निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात. हे लोकं स्पष्ट आणि कडवट बोलतात.

advertisement

ज्योतिषांच्या मते, देव आणि राक्षस गणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये. कारण या दोघांच्या स्वभावात खूप फरक आहे. त्यामुळे त्यांच्या सहजीवनात स्थिरता येत नाही. देव गणाच्या लोकांसाठी मनुष्य गणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो. तर मानव गणाचे लोकं देव आणि राक्षस या दोघांशी विवाह करू शकतात.

मकर संक्राती म्हणजे नेमकं काय? सूर्याचा मकर राशीत कसा होतो प्रवेश

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Astro Tips: देव गण, मनुष्य गण, राक्षस गण! गणानुसार व्यक्तीमध्ये असे गुण-दोष आढळतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल