Makar Sankranti Vastu Tips: मकर संक्रांतीला आज घरी आणाव्या या 5 वस्तू, कुटुंबावार धनदेवतेची राहते कृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Makar Sankranti Vastu Tips: मकर संक्राती हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो आणि ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही त्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही गोष्टी घरी आणणे शुभ मानले जातात.
मुंबई : मकर संक्रांत हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचे प्रतीक आहे. हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो आणि ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही त्याचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी घरात काही खास वस्तू आणल्याने सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते.
मकर संक्रांतीला घरी कोणत्या गोष्टी आणाव्या -
तीळ: मकर संक्रांतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तू खाण्याची आणि दान करण्याची प्रथा आहे. वास्तुशास्त्रानुसार, तीळ नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि सकारात्मकता आणतात. म्हणून, या दिवशी घरात तीळ आणणे शुभ मानले जाते.
गूळ: गूळ सूर्याचे प्रतीक आहे आणि त्याला सकारात्मक उर्जेचा स्रोत मानले जाते. मकर संक्रांतीला गुळापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्याने आणि दान केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते.
advertisement
गहू: मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या देव्हाऱ्यात गहू ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि कौटुंबिक त्रासांपासून मुक्तता मिळते. यामुळे घरात शांती आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते.
गंगाजल: गंगाजल पवित्र मानले जाते आणि ते घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात गंगाजल आणल्याने सौभाग्य मिळते.
advertisement
पिवळ्या रंगाच्या वस्तू: पिवळा रंग सूर्याचे प्रतीक आहे आणि तो समृद्धी आणि आनंदाचा रंग मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात पिवळे कपडे, फळे किंवा इतर वस्तू आणल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
-मकर संक्रांतीच्या दिवशी इतर काही गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत.
-या दिवशी घराची स्वच्छता करावी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अगरबत्ती लावावी.
advertisement
-सूर्यदेवाची पूजा करावी आणि त्याला अर्घ्य अर्पण करावे. गरीब आणि गरजूंना दान करावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 14, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti Vastu Tips: मकर संक्रांतीला आज घरी आणाव्या या 5 वस्तू, कुटुंबावार धनदेवतेची राहते कृपा