मासिक शिवरात्री व्रत 17 मार्च रोजी पाळले जाणार आहे. हा दिवस मराठी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. मासिक शिवरात्री दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. महाशिवरात्री वर्षातून एकदाच साजरी केली जात असली तरी दर महिन्याला मासिक शिवरात्री साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. या दिवशी मासिक शिवरात्री व्रत आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि घरात समृद्धी वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; झाली प्रतिक्षा संपली, आता खुशखबर
मार्च मासिक शिवरात्री 2026 पूजा मुहूर्त -
कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 17 मार्च 2026 रोजी सकाळी 09:23 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, 18 मार्च 2026 रोजी सकाळी 08:25 वाजता संपेल. संध्याकाळी प्रदोष काळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे महत्त्वाचे असल्याने मासिक शिवरात्री 17 मार्चच्या रात्री येणाऱ्या निशिता काळादरम्यान रात्री उशिरा साजरी केली जाते. त्यानुसार मासिक शिवरात्री 17 मार्च रोजी साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त 17 मार्च रोजी मध्यरात्री 12:07 ते 12:55 पर्यंत आहे, म्हणजेच फक्त 48 मिनिटांचा कालावधी असेल, स्नान करून भगवान शंकराची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडा.
पंचकामध्ये येणारी मासिक शिवरात्री -
द्रिक पंचांगानुसार, मार्चमधील पंचक 16 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 06:15 वाजता सुरू होईल आणि 20 मार्च रोजी पहाटे 02:28 पर्यंत चालेल. त्यामुळे मासिक शिवरात्री पंचकामध्ये येते, परंतु याचा मासिक शिवरात्रीच्या पूजेवर परिणाम होणार नाही, कारण भगवान शिव हे सर्व काळाचे स्वामी महाकाल आणि देवाधिदेव महादेव आहेत.
सतत आर्थिक अडचणीत, आवक घटलीय? आज आत्ता पाहा घरातील या 7 गोष्टी नीट आहेत का!
मासिक शिवरात्रीचे व्रत कसे करावे?
मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प घ्या. त्यानंतर घरी किंवा मंदिरात पूजा करा. भगवान शंकराचा अभिषेक करा. त्यानंतर रात्री पाणी किंवा गंगाजल, दूध, दही, मध, बेलपत्र, धतुरा आणि भांग, पांढरी फुले इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करा. "ॐ नम: शिवाय" मंत्राचा जप करा. मासिक शिवरात्रीला पूर्ण उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फळे खाऊ शकता. खाण्यात फक्त सैंधव मीठ वापरा. या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.
