TRENDING:

Palmistry: अंगठ्यावरच्या खुणा सांगतील तुम्ही किती भाग्यवान! आकारावरून कळू शकतात या गोष्टी

Last Updated:

Palmistry: हस्तरेषेद्वारे भविष्य जाणून घेण्यासाठी अंगठ्याची ठेवण पाहून त्यावरूनही काही गोष्टी सांगता येतात. अंगठ्याचा आकार, त्यावरच्या खुणा माणसाचा स्वभाव ओळखण्यासाठी मदत करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयुष्यात सतत अपयश येत असेल, वाद-ताण-तणाव यातून काही केल्या सुटका होत नसेल तर अनेकजण ज्योतिषशास्त्राची मदत घेतात. यातील हस्तरेषा विज्ञानानुसार हातांवरच्या रेषांद्वारेच भविष्य सांगितलं जाते. शिवाय हाताच्या अंगठ्यावरूनही भविष्य सांगता येऊ शकतं. व्यक्तीनुसार अंगठ्याचे विविध आकार, त्यात तयार होणाऱ्या खुणा आणि अंगठ्याची रचना यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
News18
News18
advertisement

हस्तरेषेद्वारे भविष्य जाणून घेण्यासाठी अंगठ्याची ठेवण पाहून त्यावरूनही काही गोष्टी सांगता येतात. अंगठ्याचा आकार, त्यावरच्या खुणा माणसाचा स्वभाव ओळखण्यासाठी मदत करतात. हातांच्या अंगठ्यावर तयार होणाऱ्या काही रेषा त्या व्यक्तीच्या सुख आणि सौभाग्याचं प्रतीक समजल्या जातात. अंगठ्यावर तयार होणाऱ्या काही रेषांमुळे त्या व्यक्तीला काही अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो. अंगठ्यांच्या विविध आकार व ठेवणींनुसार माणसांचं भविष्य कसं बदलू शकतं ते पाहू.

advertisement

अंगठ्याचे आकार व माणसाचे स्वभाव -

लवचिक नसलेल्या आणि लांब आकाराच्या अंगठ्याचे लोक खूप कष्टाळू, समजूतदार, सतर्क आणि हुशार असतात. या लोकांना फसवणं सोपं नसतं. त्यांचे विचार स्पष्ट असतात. लांब, बारीक आणि लवचिक अंगठा असणारे लोक खूप भावनिक असतात. इतरांच्या समस्या या आपल्या समजून त्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. एखाद्या व्यक्तीची मूठ उघडल्यानंतर अंगठा आणि पहिलं बोट यांच्यात 90 अंशांचा कोन साधला जात असेल, तर असे लोक खूप समजूतदार असतात आणि त्यांना आपल्याला काय करायचं आहे, हे बरोबर कळालेलं असतं. एखादी गोष्ट करायची ठरवली, तर ती ते पूर्ण करतातच.

advertisement

आज मौनी अमावस्येला करा 2 उपाय! गृहक्लेश, आर्थिक अडचणी होतील दूर

अंगठा व पहिलं बोट यांच्यात 45 अंशांपेक्षा कमी कोन तयार झाला, तर असे लोक स्वतःच्या फायद्याबद्दल आधी विचार करतात. ज्या लोकांचा अंगठा लवचिक असतो व जास्त वाकतो, ते जास्त मनमिळावू असतात.

अंगठ्याचे विविध भाग

अंगठ्याचा पहिला भाग म्हणजे वरचा भार मोठा असेल, तर असे लोक कोणावर तरी अवलंबून असतात. एखादी गोष्ट ठरवून ते पूर्ण करतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक चणचण कधीच जाणवत नाही. अंगठ्याचा मधला भाग लांब असेल, तर असे लोक खूप बुद्धिमान असतात. एखाद्या वादविवादात ते तर्क लावून जिंकू शकतात. अंगठ्याचा खालचा भाग लांब असेल, तर अशा लोकांना आयुष्यात कसलीच उणीव भासत नाही.

advertisement

अंगठ्याचा आकार, अंगठ्याच्या 3 भागांचा आकार व त्याची लवचिकता यांच्यानुसार माणसाचा स्वभाव ओळखता येऊ शकतो. अर्थात एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला नेहमीच उपयोगी पडू शकतो.

श्रीकृष्णाने सांगितलेले माणसाचे 3 अवगुण! यश-पैसा-किर्ती नेहमीच दूर राहते

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Palmistry: अंगठ्यावरच्या खुणा सांगतील तुम्ही किती भाग्यवान! आकारावरून कळू शकतात या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल