उज्जैन : खूप कमी लोकांना माहित असेल की, आपल्या वापरातल्या, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या भाग्याशी असतो. त्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि त्याचा परिणाम आपल्या कामावर, पर्यायाने प्रगतीवर होत असतो. त्यामुळे कोणता रंग जवळ बाळगायचा, कोणत्या गोष्टींचं आकर्षण पाळायचं याबाबत वास्तूशास्त्रात काही नियम दिलेले आहेत. हे नियम व्यवस्थित फॉलो केल्यास आपलं आयुष्य सकारात्मकतेने व्यापून जायला वेळ लागत नाही.
advertisement
पूर्वी जशी लोकांच्या दिवसाची सुरुवात न्यूजपेपरने व्हायची तशी आता आपल्या दिवसाची सुरुवात मोबाईलने होते. मग सकाळी-सकाळी ताज्या घडामोडी पाहायच्या असल्या तरी आपण त्या मोबाईलमध्येच पाहतो. म्हणजेच काय, झोपेतून उठल्यावर सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो आपल्या मोबाईलचा वॉलपेपर किंवा स्क्रीनसेव्हर. त्यामुळे मोबाईलमध्ये पहिला दिसणारा हा फोटो आपल्याला सकारात्मकता देणाराच असायला हवा. कारण त्यावर ठरतं की पुढे आपला संपूर्ण दिवस कसा जाणार आहे.
हेही वाचा : मनी प्लांटचं माहित नाही; पण 'ही' 3 रोपं घरात नक्कीच आणू शकतात सुख, समृद्धी!
वडीलधारी माणसं बहुतेकदा मोबाईलचा वॉलपेपर म्हणून देवाचा फोटो ठेवतात, ही अत्यंत चांगली बाब आहे. यामुळे आपल्या आयुष्यात शांती आणि समृद्धी येते. आपण मोबाईल जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा तेव्हा देवाचं दर्शन होतं, ज्याचा सकारात्मक परिणाम हळूहळू आपल्या आयुष्यावर दिसून येते.
आजकालच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक जगात अनेकजण मानसिक ताण-तणावाने ग्रस्त असतात. अशावेळी मोबाईलचं वॉलपेपर म्हणून पावसाचा फोटो ठेवावा. या कोसळणाऱ्या पाण्यामुळे मनाला शांतता मिळते.
जर बरीच वर्ष तुमच्या आयुष्यात कोणीच नसेल किंवा तुमचं असलेलं नातं तुमच्यासाठी अडचणीचं ठरत असेल, जुळता-जुळता लग्न मोडत असेल, तर मोबाईलवर गुलाबाच्या फुलाचं वॉलपेपर ठेवावं. यामुळे कितीही दुःख असलं तरी मन कायम प्रसन्न राहतं.
आपली प्रगती खुंटलीये असं वाटत असेल, कितीही मेहनत करून यश मिळत नसेल तर मोबाईलवर पायऱ्या चढणाऱ्या व्यक्तीच्या फोटोचा वॉलपेपर ठेवावा. यामुळे कितीही अपयश वाट्याला आलं तरी तुम्ही आतून कायम सकारात्मक असाल.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.