ज्योतिषी गौरव दीक्षित यांच्या माहितीनुसार, उजव्या तळहाताच्या वरच्या बाजूला (अंगठ्याकडे) तीळ असणाऱ्या व्यक्तीला श्रीमंती लाभते. डाव्या तळहाताच्या वरच्या बाजूला तीळ असेल तर त्या व्यक्तीच्या हातात पैसा राहत नाही. अशा व्यक्तीजवळ पैसा राहणं कठीण असतं.
तळहाताच्या मध्यभागी तीळ - असणं जीवनातील समृद्धी, आनंद, शांती आणि यशाचे प्रतीक मानले जाते. याशिवाय अशा व्यक्तीला चांगला जीवनसाथी, कौटुंबिक प्रेम आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. काहीवेळा हा तीळ अडचणी आणि संघर्षांचे देखील प्रतिनिधित्व करतो, परंतु त्याचा आकार मोठा नसेल तर तो शुभ मानला जातो.
advertisement
मंगळ करणार अमंगळ दूर! या मूलांकांना खुशखबर; संकट टळणार आर्थिक लाभ
तळहातावर वरच्या बाजूवर तीळ - हा तीळ आत्मविश्वास, धैर्य आणि यशाचे प्रतीक आहे. अशी व्यक्ती आपल्या जीवनात उच्च स्थान प्राप्त करू शकते आणि त्याचा सामाजिक स्तर चांगला होत जातो. जर हा तीळ खूप मोठा किंवा गडद असेल तर ते काही शारीरिक किंवा मानसिक त्रासाचे लक्षण असू शकते.
तळहाताच्या तळाशी, करंगळीजवळ तीळ - हा तीळ माणसाला हुशार, गोष्टींचा अचूक विश्लेषक आणि चांगला संवादक बनवतो. अशा व्यक्ती उत्तम वक्ता आणि लेखक होऊ शकतात. जर तीळ खूप मोठा असेल किंवा फिकट रंगाचा असेल तर त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास कमी असू शकतो.
तळहाताच्या तळाशी, अंगठ्याजवळ - येथे तीळ असणाऱ्या व्यक्तीला प्रेम आणि सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव येतो. यामुळे व्यक्तीमध्ये खुलेपणा येतो आणि प्रेम संबंधांमध्ये यश येते, असे मानले जाते. जर हा तीळ खूप गडद रंगाचा असेल तर ते प्रेम किंवा कुटुंबातील तणाव दर्शवतो.
संघर्ष इथंवर थोडा नाही केलेला! या राशींचे आता नशीब चमकणार; मंगळाची कृपादृष्टी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
