पंचकाचे 5 प्रकार
1. रोग पंचक (रविवारपासून सुरू होणारे): हे पंचक शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण देते. या 5 दिवसांत व्यक्ती आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त राहू शकते. या काळात नवीन उपचारांची सुरुवात करणे किंवा शस्त्रक्रिया करणे (अत्यंत गरज नसल्यास) टाळावे.
2. राज पंचक (सोमवारपासून सुरू होणारे): हे पंचक इतर पंचकांच्या तुलनेत शुभ मानले जाते. यादरम्यान सरकारी कामे, मालमत्तेचे व्यवहार किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक असते.
advertisement
3. अग्नी पंचक (मंगळवारपासून सुरू होणारे): या काळात आगीची भीती असते. बांधकाम, मशिनरीशी संबंधित कामे किंवा अग्नीशी संबंधित नवीन प्रयोगांना या काळात मनाई असते. मात्र, कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांसाठी हे पंचक शुभ मानले जाते.
4. चोर पंचक (शुक्रवारपासून सुरू होणारे): या काळात प्रवास करणे आणि आर्थिक व्यवहार करणे टाळावे. चोर पंचकात धनहानी, फसवणूक आणि चोरी होण्याची दाट शक्यता असते. या ५ दिवसांत कोणालाही कर्ज देऊ नका किंवा नवीन गुंतवणूक करू नका.
5. मृत्यू पंचक (शनिवारपासून सुरू होणारे): हे सर्वात जास्त अशुभ आणि घातक मानले जाते. नावाप्रमाणेच हे पंचक मृत्यूसमान क्लेश देणारे असते. या काळात कोणत्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम करू नये. यामुळे अपघात, गंभीर दुखापत किंवा कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवण्याची दाट शक्यता असते.
पंचक काळ अशुभ का मानला जातो?
'पंचक' या शब्दाचा अर्थ 'पाच' असा आहे. अशी मान्यता आहे की, या काळात घडलेली कोणतीही अशुभ घटना पाच वेळा पुनरावृत्ती होऊ शकते. उदा. जर या काळात एखाद्याचा मृत्यू झाला किंवा नुकसान झाले, तर तशीच घटना कुटुंबात किंवा नात्यात पाच वेळा घडण्याची भीती असते. धनिष्ठा (उत्तरार्ध), शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती या पाच नक्षत्रांच्या संयोगातून पंचक बनते. यातील प्रत्येक नक्षत्र विशिष्ट कामासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे या काळाला अत्यंत अशुभ मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
