TRENDING:

Pradosh Vrat: भौम प्रदोष आणि मासिक शिवरात्री एकत्र येण्याचा दुर्मिळ योग, या मुहूर्तावर करा शिवपूजा

Last Updated:

Bhaum Pradosh Vrat 2024: आज प्रदोष आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी येण्याचा योगायोग जुळून आला आहे. ज्योतिषी डॉ. गौरव दीक्षित यांच्याकडून भौम प्रदोष व्रताची शुभ वेळ, महत्त्व आणि नियम जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 09 जानेवारी : वर्ष 2024 चं पहिलं प्रदोष व्रत आज 9 जानेवारी रोजी साजरे केले जाणार आहे. हे व्रत महादेवाला समर्पित आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला येतं. हा दिवस शास्त्रात खूप शुभ मानला गेला आहे. या काळात अनेक शिवभक्त उपवास करून शंकराची पूजा करतात. देशाच्या दक्षिणेकडील भागात या व्रताला भौमप्रदोष म्हटले जाते. प्रदोष व्रतामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांची विशेष पूजा करणाऱ्यांवर सदैव देवाची कृपा राहते, असे मानले जाते. विशेष म्हणजे आज प्रदोष आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी येण्याचा योगायोग जुळून आला आहे. ज्योतिषी डॉ. गौरव दीक्षित यांच्याकडून भौम प्रदोष व्रताची शुभ वेळ, महत्त्व आणि नियम जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

प्रदोष व्रत 2024 चे महत्त्व -

या वर्षातील पहिला प्रदोष व्रत आज मंगळवारी आहे, त्यामुळे त्याला भौम प्रदोष म्हणून ओळखले जाते. या शुभ दिवशी समर्पण आणि भक्तिभावानं भगवान शिव आणि देवी पार्वतीची उपासना केल्यास भक्तांना इच्छित फळ मिळते. भौम प्रदोष व्रतात देवांची पूजा केल्याने सौभाग्य, समृद्धी आणि आनंद मिळतो. काही भक्त या दिवशी भगवान शिवाची नटराजाच्या रूपात पूजा करतात. असे मानले जाते की, हे व्रत पाळल्यानंतर माता पार्वतीला भगवान भूत भवन म्हणजेच भगवान शंकर सापडले. या व्रताचे पालन केल्यानं घरात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा, वैभव प्राप्त होतात आणि इच्छित परिणाम मिळतात. या व्रतासाठी संध्याकाळी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते.

advertisement

#RamAyenge : उत्सुकता शिगेला, अयोध्येत पोहोचली 5 किलो शुद्ध चांदीची अखंड ज्योत

प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त -

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 8 जानेवारी रोजी रात्री 11.26 पासून सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवारी, 9 जानेवारी रोजी रात्री 10:18 वाजता संपेल. प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते, म्हणून 9 जानेवारीला प्रदोष व्रत पाळले जाईल. भगवान शंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:13 ते रात्री 8 आहे.

advertisement

प्रदोष व्रत पूजा नियम -

प्रदोष व्रतात भगवान शिवाची पूजा करण्यासाठी संध्याकाळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. शिवभक्तांनी भौम प्रदोषाच्या दिवशी पहाटे उठून पवित्र स्नान करावे. यानंतर देव्हारा स्वच्छ करावा. त्यानंतर शिव परिवाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांच्यासमोर दिवा लावावा. यानंतर देवाला फुले, मिठाई आणि फळे अर्पण करा आणि शिवाच्या मंत्रांचा जप करा. आरतीने पूजेची सांगता करा, शेवटी शंख वाजवा. यानंतर सात्विक भोजनाने भक्त उपवास सोडू शकतात.

advertisement

बाळासाठी खास असं नाव शोधताय? मग श्री रामावरून ही 6 युनिक नावं पाहून घ्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Pradosh Vrat: भौम प्रदोष आणि मासिक शिवरात्री एकत्र येण्याचा दुर्मिळ योग, या मुहूर्तावर करा शिवपूजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल