धारदार वस्तूंचा वापर टाळा
गर्भवती महिलांनी ग्रहण काळात सुरी, कात्री, सुई किंवा ब्लेड यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये. जुन्या समजुतीनुसार, ग्रहण काळात अशा वस्तू वापरल्यास जन्माला येणाऱ्या बाळाच्या शरीरावर खुणा राहू शकतात किंवा काही शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या काळात भाजी चिरणे किंवा शिवणकाम करणे पूर्णपणे टाळावे.
advertisement
घराबाहेर पडणे टाळा
ग्रहण काळात चंद्राकडून येणारे किरण दूषित असतात, असे मानले जाते. गर्भवती महिलेने थेट ग्रहणाच्या प्रकाशात येऊ नये. जर बाहेर पडणे अनिवार्य असेल, तर स्वतःला पूर्णपणे झाकून घ्यावे, जेणेकरून किरण अंगाला स्पर्श करणार नाहीत.
झोपताना सरळ झोपावे
असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलेने हात-पाय दुमडून किंवा पोटावर झोपू नये. शक्य असल्यास या काळात झोपणे टाळावे, पण जर झोपायचे असेल तर शरीर ताठ आणि सरळ ठेवून झोपावे.
अन्न आणि पाण्याचे सेवन
सूतक काळ लागल्यापासून अन्न ग्रहण करणे निषिद्ध मानले जाते. जर भूक लागलीच, तर आधीच तुळशीचे पान टाकून ठेवलेले अन्न किंवा पाणी घ्यावे. तुळशीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते, ज्यामुळे अन्न शुद्ध राहते.
टाळवाटाळवी आणि चिडचिड
ग्रहण काळात मानसिक स्थितीवर परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी वादावादी, चिडचिड किंवा रडणे टाळावे. याचा थेट परिणाम बाळाच्या स्वभाववर होऊ शकतो.
शास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मनाचा आणि गर्भाचा कारक मानला जातो. ग्रहणावेळी राहू-केतूचा प्रभाव वाढल्याने चंद्राची शक्ती क्षीण होते, ज्याचा परिणाम गर्भातील बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर होऊ शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, ग्रहणावेळी वातावरणात काही बदल होतात, ज्यामुळे अन्नावर जिवाणूंचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊ शकतो, म्हणूनच खाण्यापिण्याचे नियम पाळले जातात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
