हरिद्वार - संतती प्राप्तीसाठी अनेकजण विविध उपाय करतात. विविध रुग्णालयात जातात. तसेच धार्मिक उपायही करतात. मात्र, तरीही काही जणांना संतती प्राप्ती होत नाही. अनेकदा महिला गर्भधारणेसाठी काही औषधींची मदत घेतात. मात्र, तरीही फायदा होत नाही. पण धर्मशास्त्रांत संतती प्राप्तीसाठी खूप उपाय सांगितले आहेत. यातील काही उपायांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या मनासारखी संततीची प्राप्ती होऊ शकते.
advertisement
हरिद्वारचे ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, जर एखाद्या दाम्पत्याने संतती होत नसल्याने ज्योतिष शास्त्रातील उपाय केले तर त्यांना संततीची प्राप्ती नक्की होती. हिंदू धर्मात सर्वात आधी रिद्धि-सिद्धि आणि नव निधीचे दाता गणेशाची पुजा अर्चना केली जाते. संतती प्राप्तीसाठी गणेशाची आराधना आणि पूजा पाठ खूप गरजेचा आहे.
शास्त्रांनुसार, आपल्या घराच्या मुख्यद्वारावर बाल गणेशाची मूर्ती लावल्याने विशेष लाभ मिळते. जर गणेशाची मूर्ती घरी नसेल तर ती खरेदी करावी आणि अशा ठिकाणी लावावी, जिथे जाता-येता तुमची नजर त्यावर पडेल. असे केल्याने संततीचे सुख मिळते.
वय 75, एकदाही मतदानाचा हक्क चुकवला नाही, तरुणाईला केलं हे महत्त्वाचं आवाहन, VIDEO
पंडित श्रीधर शास्त्री पुढे म्हणाले की, याशिवाय पती-पत्नीने दररोज गणपतीच्या 108 नावांचे स्मरण करावे. दररोज “संतान गणपत्ये नमः, गर्भदोषहरो नमः, पुत्र पौत्राय नमः” या गणेश मंत्राचा जप केल्यानं संततीची प्राप्ती होते.
तसेच घरात लावलेल्या झाडांची मुलासारखी काळजी घ्यावी. तसेच एक महिना जेवणानंतर पिवळ्या रंगांची मिठाई नक्की खावी. दुसऱ्या महिन्यात पती पत्नीने पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावेत आणि तिसऱ्या महिन्यात गरजूंना आपल्या सामर्थ्यानुसार, 11, 21, 51, 101, 151, 251, 551, 1100, 2100, 3100, 5100 रक्कम पिवळ्या रंगाच्या वस्तूसह, पिवळे वस्त्र, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचे फळ-फूल दान करावे. हे उपाय केल्याने संततीची प्राप्ती होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सूचना - ही बातमी राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
