वय 75, एकदाही मतदानाचा हक्क चुकवला नाही, तरुणाईला केलं हे महत्त्वाचं आवाहन, VIDEO

Last Updated:

maharashtra assembly election - लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि हातभार लावण्यासाठी मुंबईकर खूप उत्साहाने मतदान करत आहेत. मुंबईमध्ये एकूण 8 विधानसभांसाठी मतदान होत आहेत. अंधेरी पूर्व येथे देखील सामान्य नागरिकांपासून ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे.

+
75

75 वर्षांचे प्रकाश दळवी

निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज संपूर्ण राज्यात मतदान पार पडत आहे. मुंबईमध्येही सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि हातभार लावण्यासाठी मुंबईकर खूप उत्साहाने मतदान करत आहेत. मुंबईमध्ये एकूण 8 विधानसभांसाठी मतदान होत आहेत. अंधेरी पूर्व येथे देखील सामान्य नागरिकांपासून ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे.
advertisement
75 वर्षांचे प्रकाश दळवी यांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तरुण-तरुणींना मतदान करण्याचे आवाहन केले. लोकल18 बोलताना ते म्हणाले की, जर आपण आता मतदान केले नाही तर आपण आपला आवडता नेता निवडून देण्यासाठी मदत करत असतो. तसेच मी कधीही मतदानाचा हक्क चुकावला नाही. मतदान करणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे मतदान करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या एका मताची किंमत ही खूप मोठी असते. त्यामुळे सर्वांनीच लोकशाहीला बळकट करण्यासाठी आवर्जून मतदान करावे.
advertisement
या विभागात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मुरजी पटेल निवडणूक लढवत आहेत. या विभागाची राजकीय पार्श्वभूमी फार वेगळी राहिली आहे. पण यंदाच्या निवडणुकीला कोणता उमेदवार नेमका जिंकून येईल, हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.
Mohan Agashe : ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर काय म्हणाले?, VIDEO
2022 मध्ये कार्यकाळ सुरू असताना शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यानंतर त्यांची पत्नी ऋतुजा रमेश लटके यांनी बिनविरोध ती निवडणूक जिंकली. मात्र, सध्या शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून येथील मतदार कुणाला कौल देतात, हे शनिवारी 23 तारखेला निवडणुकीच्या दिवशी समजेल.
advertisement
4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात -
राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सकाळ पासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
वय 75, एकदाही मतदानाचा हक्क चुकवला नाही, तरुणाईला केलं हे महत्त्वाचं आवाहन, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement