TRENDING:

पुण्यातील ऐतिहासिक राजवाड्यात राम जन्मोत्सव, तब्बल 300 वर्षांची अखंड परंपरा, Video

Last Updated:

ऐतिहासिक राजवाडा राम जन्मोत्सवानिमित्त रंगबेरंगी पडद्यांनी आणि फुलांनी सजवण्यात आला होता. या राम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे: देशभर रामजन्माचा सोहळा साजरा होतं आहे. पुण्यात भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी 11 च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12:30 वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला.

advertisement

भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते राम जन्मसोहळा झाला. यावेळी रंगबेरंगी पडद्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. संस्थानच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नऊवारी साड्या असे पोशाख परिधान केले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत रामजन्म सोहळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता.

advertisement

2 हजार 24 वेळा लिहिले राम, 3 तास घेतली मेहनत, पुण्यातील श्रुतीने साकारली मोडी लिपीतील प्रभू श्रीरामांची प्रतिमा Video

राम जन्मोत्सवाची 300 वर्षाची परंपरा

चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतिंच्या हस्ते पुण्य हवाचनापासून श्रीरामनवमीच्या उत्सवातील धार्मिक व लौकिक कार्यक्रमास सुरूवात होते. या राम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. तर त्यापैकी सध्या ऐतिहासिक राजवड्यात 149 वर्षे सोहळा साजरा होतोय.

advertisement

मुक्तकेशी श्रीराम अन् मांडीवर बसलेली सीतामाता, 'या' मंदिरातील अनोखी मूर्ती पाहिलीये का?, Video

17 व्या शतकातील राममूर्ती पण टाकाची करतात पूजा

भोर तालुक्याच्या ऐतिहासिक परंपरेने पंतसचिवांचे कुलदैवत श्रीराम होय. भोर संस्थानचे संस्थापक श्रीमंत शंकराजी नारायण यांचे पुत्र नारोपंत यांना पुरंदर तालुक्यातील बेलसरच्या अंताजी मोरेश्वर खळदकर यांनी 1720 मध्ये श्रीरामाची मूर्ती दिली. ही मूर्ती भोर जवळील ज्या ओढ्याकाठी दिली त्याला राम ओढा हे नाव मिळाले. त्या पूर्वी पंतसचिवांकडे घरगुती श्रीरामनवमी उत्सव साजरा व्हायचा. मात्र ही मूर्ती मिळाल्यापासून श्रीरामनवमी उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाले. याठिकाणी मूर्ती ऐवजी सोहळ्यात रामाच्या टाकाची पूजा केली जाते, असं संस्थांनचे राजेशराजे यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
पुण्यातील ऐतिहासिक राजवाड्यात राम जन्मोत्सव, तब्बल 300 वर्षांची अखंड परंपरा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल