2 हजार 24 वेळा लिहिले राम, 3 तास घेतली मेहनत, पुण्यातील श्रुतीने साकारली मोडी लिपीतील प्रभू श्रीरामांची प्रतिमा Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. या निम्मिताने पुण्यातील एका तरुणीने प्रभू श्रीरामांची मोडी लिपितील प्रतिमा साकारली आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभुरामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी, भगवान रामाची जयंती साजरी केली जाते. या निम्मिताने पुण्यातील एका तरुणीने प्रभू श्रीरामांची मोडी लिपितील प्रतिमा साकारली आहे.
कशी साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिमा?
पुण्यातील श्रुती गावडे हिने प्रभू श्रीरामांची शिवकालीन मोडी लिपीत भगवान प्रतिमा साकारली आहे. 2 हजार 24 वेळा राम हे नाव लिहून तिने ही प्रतिमा 3 तास मेहनत घेत साकारली आहे. भगवान श्रीरामांबद्दल असलेल्या आस्था यातूनच ही प्रतिमा साकारत गेली असल्याचं तिने म्हटलंय.
advertisement
मोडी लिपी म्हणजे काय?
मुळात मोडी लिपी ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे, जी महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी प्राथमिक भाषा आहे. त्याच्या उत्पत्ती संदर्भात अनेक सिद्धांत आहेत. 21 व्या शतकातील मराठी लोकांचे असे विचार आणि मत आले आहे की जर मराठी भाषेची मूळ असलेली मोडी लिपी पुन्हा वापरात आणली गेली तर मराठी भाषेचा प्रभाव वाढेल. मोडी लिपी श्रुती अनेक वर्षांपासून शिकत होती.
advertisement
Ram Navami Wishes : श्रीराम जन्मोत्सव करा आनंदात साजरा, सर्वांना पाठवा हे शुभेच्छा संदेश!
रामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामांची ही आकर्षक प्रतिमा राम नामाचा जप करत तिने साकारली आहे. या चित्रात प्रभू श्रीराम यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न असे भाव दाखवले गेलेत. त्याचप्रमाणे मुकुटावर सूर्याची आकृती, गळ्यामध्ये फुलांचा हार तर पाठीवर धनुष्यबाण, कपाळावर गंध अशा स्वरूपाचे आकर्षक चित्र काढण्यात आलं. राम - राम अशापद्धतीने लिहून टोकाच्या पेन्सिलने शुभ्र पानावर हे चित्र रेखाटले आहे. रेखाटलेल्या चित्रात प्रभू श्रीराम यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 17, 2024 11:24 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
2 हजार 24 वेळा लिहिले राम, 3 तास घेतली मेहनत, पुण्यातील श्रुतीने साकारली मोडी लिपीतील प्रभू श्रीरामांची प्रतिमा Video