अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी यजमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अयोध्येची ओळख प्रभू रामामुळेच आहे. यामुळे गंगा-जमुनी संस्कृतीची उदाहरणेही अयोध्येत वेळोवेळी पाहायला मिळतात. रामनगरी अयोध्या बराच काळ मंदिर-मशीद वादात अडकली होती. अयोध्येला रामराज्यामुळे ओळखले जाते. त्याच रामराज्याच्या पुनरागमनाची झलक पुन्हा एकदा अयोध्येत पाहायला मिळाली. एका मुस्लीम मुलीच्या रामभक्तीने सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.
advertisement
प्रभू रामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उत्तरप्रदेशातील बस्ती येथील एक मुलगी आपली कला दाखवत अयोध्येत पोहोचली. यावेळी तिने गंगा-जमुनी संस्कृती संस्कृतीचे अनोखे उदाहरण सादर केले. फरीजा मन्सूरी असे या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता 11वीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने राम की पैडी इथे बसून दोन चित्रे काढली आहेत. एका चित्रात श्री राम धनुष्याला तार बांधून उभे आहेत, तर दुसऱ्या चित्रात श्री राम खारूताईसोबत उभे आहेत. खारूताईने लंका प्रवेशाआधी सेतू बनवण्यामध्ये आपले योगदान दिले होते.
फरीजा मन्सूरी म्हणाली की, श्री राम हे माझे आदर्श आहेत आणि आता श्री रामाचे मंदिर बांधले जात असताना मी रामाची आणि रामाने दिलेल्या संदेशांचे चित्र बनवत आहे. श्रीरामांनी दिलेला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. अयोध्येची तीच जुनी ओळख जाती धर्माच्या वर उठून परतावी, हा यामागचा उद्देश्य आहे.
आई-वडिलांपासून मिळाली प्रेरणा -
16 वर्षीय फरिजा मन्सूरी हिने सांगितले की, मी भगवान रामाचे पेंटिंग बनवले आहे. ते बनवण्यासाठी सुमारे 2 तास लागले आणि मुस्लिम असूनही मी रामाचे पेंटिंग बनवत आहोत. ही प्रेरणा मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. इतकेच नव्हे तर हे पेटिंग बनवण्यामागे माझा एकच उद्देश आहे की, हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र राहावे. बंधुभाव पाळावा. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जात आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. काही लोकांनी मला नकारही दिला पण माझ्या पालकांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे आणि मी काम करत राहीन, असे तिने सांगितले.