नेमकं 'ब्लड मून' म्हणजे काय?
जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या अगदी मधोमध येते, तेव्हा तिची सावली चंद्रावर पडते. याला आपण चंद्रग्रहण म्हणतो. पण खग्रास ग्रहणावेळी चंद्र पूर्णपणे काळा पडत नाही. पृथ्वीच्या वातावरणातून सूर्यप्रकाश जेव्हा जातो, तेव्हा निळा रंग विखुरला जातो आणि फक्त लाल-नारंगी रंगाचे लांब लहरींचे किरण चंद्रापर्यंत पोहोचतात. यामुळे चंद्र तांबूस किंवा रक्तासारखा लाल दिसतो. यालाच 'रेले स्कॅटरिंग' असेही म्हणतात. आज हेच दृश्य मुंबईच्या आकाशात अवघ्या 3 मिनिटांसाठी साकारणार आहे.
advertisement
मुंबईसाठी 'डेडलाईन' कोणती?
मुंबईत चंद्र मावळतीला असताना ग्रहण सुरू झाले आहे, त्यामुळे चंद्रोदय होताना तो आधीच ग्रहणाच्या छायेत असेल. मुंबईकरांना या विलोभनीय दृश्याचा आनंद घेण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळणार आहे. सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मुंबईमधून ब्लड मून दिसेल. पण हे अद्भुत दृश्य काही मिनीटांसाठीच असेल. ब्लड मूनचा अनोखा नजारा पाहण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 मिनिटांचा अवधी असेल. 6:45 ते 6:48 या वेळेत तुम्हाला ब्लड मून पाहता येणार आहे. या 3 मिनिटांनंतर चंद्र पुन्हा आपल्या मूळ पांढऱ्या रंगात परतायला सुरुवात होईल. त्यामुळे 3:45 वाजता तुमची नजर पूर्वेकडील क्षितिजावर असणे आवश्यक आहे.
कसे पाहाल हे दृश्य?
मुंबईत इमारतींची गर्दी असल्याने चंद्रोदय लवकर दिसत नाही. हे दृश्य पाहण्यासाठी घराची गच्ची किंवा समुद्रकिनारा गाठणे उत्तम ठरेल. तुमची नजर नेमकी पूर्वेला असावी. सूर्यास्ताच्या विरुद्ध दिशेला चंद्र उगवताना दिसेल. हे ग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. जर तुमच्याकडे दुर्बीण असेल, तर चंद्राचा लाल रंग अधिक गडद आणि स्पष्ट दिसेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
