करौली : शनिदेव यांचं नाव ऐकताच मनात भीती निर्माण होते. असे म्हणतात की, शनिदेव ज्याच्यावर कृपा करतात तो आयुष्यात यशस्वी होतो आणि ज्या राशीवर कोपतात, त्या राशीच्या जातकाला संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे लोक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे. न्यायदेवता म्हणून शनिदेवाची पूजा केली जाते.
advertisement
शनिदेव एकमेव असे देवता आहेत, जे सर्व 12 राशींवर आपला प्रभाव ठेवतात. शनिदेव कोपले तर मानवाच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्व राशीचे लोक विविध प्रकारचे उपाय करतात. दान-पुण्य करतात. पण यामध्ये बहुतांश जण हे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना तेल अर्पण करतात. मात्र, शनिदेव नेमकं कशामुळे सर्वात जास्त प्रसन्न होतात, हे अनेकांना माहिती नसते.
मंदिरातून निघतानाही घंटा वाजवणे योग्य आहे का?, किती वेळा वाजवावा?, महत्त्वाची माहिती
सत्य बोलणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा -
शनिदेव यांचा स्वतःचा रंग काळा आहे. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ आणि तिळाचे तेल दान करण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. पण ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनिदेव व्यक्तीच्या मनुष्याचा व्यवहार आणि त्याच्या कर्मावर सर्वात जास्त प्रसन्न होतात. करौली येथील प्रसिद्ध ज्योतिषी गिर्राज प्रसाद सोनी यांनी याबाबत माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार कृपा करतात. जे लोक सत्य बोलतात, आपले काम योग्य पद्धतीने करतात अशा लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. यामुळे शनिदेवाला न्यायदेवता असे म्हटले जाते.
खोटं बोलणाऱ्यांपासून क्रोधित होतात शनिदेव -
शनिदेव खोटं बोलणाऱ्यांपासून, तसेच प्रामाणिकपणे आपले कार्य न करणाऱ्या अप्रामाणिक आणि खोटारड्या लोकांपासून नेहमी क्रोधित राहतात. त्यांना त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा देतात. त्यामुळे त्यांनी अप्रामाणिकपणे केलेले प्रत्येक काम फसते.
100 वर्षांनी अद्भूत योग, आयुष्यात येणार आनंद, करिअरमध्येही मिळणार यश, 3 राशीच्या लोकांची चांदी
ज्योतिषी गिर्राज प्रसाद सोनी पुढे म्हणाले की, शनिदेव मजूरांवर सर्वात प्रसन्न होतात. ज्या लोकांवर शनि साडेसाती सुरू आहे, त्यांनी मजूराचे पैसे कधीही थांबवू नये तसेच संपूर्ण मजूरी द्यावी, हे कायम लक्षात ठेवावे. यासोबतच साडेसाती दरम्यान, मजूरांना अन्नदान करावे. त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या सन्मानाने शनि सर्वात जास्त प्रसन्न होतात. त्यासोबतच दान केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात, असेही त्यांनी सांगितले.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.