मंदिरातून निघतानाही घंटा वाजवणे योग्य आहे का?, किती वेळा वाजवावा?, महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
असे सांगितले जाते की, घंटा वाजवण्याचे फक्त धार्मिक महत्त्वच नाही तर शारिरीक दृष्ट्याही हे खूप फायदेशीर आहे. घंटा वाजवल्याने त्यातून उत्पन्न होणारा आवाज व्यक्तीच्या शरीराच्या 7 चक्रांना सक्रिय करते.
उद्धव कृष्णा, प्रतिनिधी
पाटणा : सनातन संस्कृतीमध्ये मंदिर हे एक सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. अनेक लोक आपल्या आयुष्यातील नकारात्मकता संपवून सकारात्मक ऊर्जा घेऊन परत येतात. मात्र, हे खूप कमी लोकांना माहिती आहे की, मंदिर मधून परतताना घंटा वाजवू नये.
पाटणा येथील सह आचार्य डॉ. राजनाथ झा यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, सकारात्मक ऊर्जा राखून ठेवण्यासाठी मंदिरातून परतताना घंटा वाजवू नये. जेव्हा जगाची सुरुवात झाली होती, तेव्हा जो स्वर सर्वत्र निनादला होता, तो घंट्याचाच होता. हाच स्वर ओंकार उच्चारणानेही जागृत होते.
advertisement
घंटा का वाजवला जातो?
डॉ. राजनाथ झा यांनी सांगितले की, हिंदू धर्मात पूजापाठ करणे हे देवाप्रती श्रद्धा प्रकट करण्याचा उत्तम मार्ग सांगितला गेला आहे. मान्यतेनुसार, ज्या घरात रोज विधीनुसार देवी-देवतांची पूजा अर्चना होते, त्याठिकाणी सुख-समृद्धीचा वास होतो. हिंदू धर्माच्या पूजा पाठ दरम्यान, अशा अनेक वस्तू असतात, ज्यामध्ये पूजा अपूर्ण मानली जाते. अशावेळी पूजेदरम्यान, घंटाही वाजवला जातो. या कारणामुळे मंदिराच्या मुख्य द्वारावर घंटा लावला जातो. तर तेच घरात लहान घंटीचा वापर केला जातो. घंटीचा आवाज ऐकायला जितका चांगला असतो, तितकेच त्याचे धार्मिक महत्त्वही आहे.
advertisement
मनाला शांतीची अनुभूती देणारा आवाज -
डॉ. राजनाथ झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात प्रवेश करताना एकदाच घंटा वाजला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवल्याने देवी-देवतांमध्ये चेतना जागृत होते आणि त्यांचे आकर्षण आपल्या भक्तांकडे वाढतो. यासोबतच घंट्याचा आवाज हा वातावरणात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो आणि यामुळे आजूबाजूच्या उपस्थित लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा नाश कतो. यामुळे वातावरण शुद्ध आणि शांती मिळते.
advertisement
परतताना घंटा का वाजवू नये -
असे सांगितले जाते की, घंटा वाजवण्याचे फक्त धार्मिक महत्त्वच नाही तर शारिरीक दृष्ट्याही हे खूप फायदेशीर आहे. घंटा वाजवल्याने त्यातून उत्पन्न होणारा आवाज व्यक्तीच्या शरीराच्या 7 चक्रांना सक्रिय करते. सोबतच घंट्याचा आवाज हा मस्तिष्कलाही शांतीचा अनुभव देतो. यासोबतच शरीरातील नकारात्मक विचार आणि वाईट गोष्टांना दूर करण्यास मदत करते. मंदिरातून परतताना घंटा वाजवण्यात काही नुकसान नाही. परंतु वैदिक नियमांनुसार, परतताना घंटा वाजवल्याने मानसिक शांतता बिघडू शकते. त्यामुळे मंदिरातून परतताना घंटा वाजवणे टाळावे, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
घंटा वाजवण्याचे नियम -
डॉ. राजनाथ झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घंटा वाजवताना लक्षात ठेवा की, घंटा कधीही खूप जोरात वाजवू नये. यासोबत सलग अनेक वेळा घंटा वाजवू नये. जास्तीत जास्त 2 ते 3 वेळाच घंटा वाजवावे. मंदिरात पोहोचल्यावर 3, 5 ते 108 वेळा घंटा वाजवता येते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Patna,Bihar
First Published :
June 11, 2024 8:21 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मंदिरातून निघतानाही घंटा वाजवणे योग्य आहे का?, किती वेळा वाजवावा?, महत्त्वाची माहिती