शनीला न्यायाची देवता म्हणतात. शनिवार हा शनीचा वार मानला जातो. शनिवारी शनिदेवाची विधिवत पूजा केल्यास शुभ फळ मिळतं, असं मानलं जातं. शनिदेव कोपतात तेव्हा माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शनिदेव नाराज होऊ नयेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. परंतु, काही वेळा जाणूनबुजून किंवा नकळत एखादी व्यक्ती असं काम करते ज्यामुळे शनिदेव नाराज होतात. एखाद्या पीडित व्यक्तीला विनाकारण त्रास देण्यासारखी कृत्यं केल्याने शनिदेव क्रोधित होतात. परिणामी संबंधित व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. कोणत्या व्यक्तींचा छळ केला किंवा त्यांना त्रास दिल्यास शनिदेव कोपतात, ते ज्योतिषाचार्य पंडित गोविंद पांडे यांच्याकडून जाणून घेऊ या.
advertisement
सरळ साधे वाटतात, पण नसतात! ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचा असा असतो स्वभाव
या व्यक्तींना त्रास देणं पडू शकतं महागात
कमकुवत व्यक्ती, महिला किंवा नोकरांना त्रास देणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कोपतात. अशा व्यक्तींना न्यायदेवता शनी शिक्षा करतात. अशा कमकुवत व्यक्तींना कधीही त्रास देऊ नये, त्यांना मदत करावी. अशा व्यक्तींना मदत करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव विशेष कृपा करतात.
फसवणूक करणाऱ्यांवरही शनिदेव होतात नाराज
इतरांची फसवणूक करणाऱ्या किंवा धोका देणाऱ्यांवर शनिदेवाची वक्रदृष्टी असते. अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना शनिदेव सोडत नाहीत. त्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा मिळते.
या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात
लोकांना नावं ठेवणाऱ्यांवर कोपतात शनिदेव
याशिवाय, ज्या व्यक्ती पाठीमागे इतरांबद्दल वाईट बोलतात आणि खोटं बोलतात त्यांच्यावरही शनिदेवाचा कोप होतो. अशा व्यक्तींची इच्छा असूनही प्रगती होत नाही. अशा व्यक्तींना शनिदेव कर्मानुसार शिक्षा देतात. अशा व्यक्ती आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक कलहामुळे त्रस्त असतात.
पशु-पक्ष्यांना त्रास देणं टाळा
पशु-पक्ष्यांना त्रास दिल्यास शनिदेवाचा कोप होतो. पशु-पक्ष्यांवर अत्याचार करणाऱ्यांना शनिदेव कधीच माफ करत नाहीत. अशा व्यक्ती याच जन्मात शनिदेवाच्या वक्रदृष्टीच्या बळी ठरतात.
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)