या 4 राशीच्या लोकांनी राहावे सावधान
वृषभ : सूर्य वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने या राशीत जन्मलेल्या लोकांना बोलण्यात कठोरता, कुटुंबात वाद आणि आर्थिक बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.
कर्क : वैदिक पंचांगानुसार, सूर्य तुमच्या चौथ्या घरातून पाचव्या घरात प्रवेश करेल. या काळात तुम्हाला मुलांशी संबंधित चिंता, प्रेमसंबंधात तणाव आणि शिक्षण क्षेत्रात अडथळे येऊ शकतात.
advertisement
वृश्चिक : सूर्याचा वृषभ राशीतील प्रवेश या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. जोडीदारासोबत मतभेद आणि सासरच्या लोकांशी संबंधात कटुता येऊ शकते, त्यामुळे या काळात सूर्यदेवाची पूजा करावी, जेणेकरून ते शांत राहतील.
कुंभ : या राशीच्या लोकांसाठी सूर्य तुमच्या दहाव्या घरातून अकराव्या घरात प्रवेश करेल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात आणि बदलीची शक्यताही आहे.
सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय : ज्या लोकांच्या या चार राशी आहेत, त्यांनी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने सावध राहावे. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची नियमित पूजा करा आणि त्यांना पाणी अर्पण करा.
रविवारी उपवास करा.
- आपल्या वडिलांचा आणि इतर मोठ्यांचा आदर करा.
- आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि वाणी मधुर ठेवा.
- गरिबांना आणि गरजूंना दान करा.
हे ही वाचा : 84 लाख योनी म्हणजे काय? मनुष्य जन्म कधी मिळतो? पद्म पुरणात दडलंय यामागचं रहस्य, वाचा सविस्तर...
हे ही वाचा : 'या' दिवशी करा पितृकार्य! रुष्ट पूर्वज होतील शांत आणि देतील आशीर्वाद; ग्रहदोष होतील दूर