'या' दिवशी करा पितृकार्य! रुष्ट पूर्वज होतील शांत आणि देतील आशीर्वाद; ग्रहदोष होतील दूर
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
ज्येष्ठ महिन्यातील अमावास्या आणि चतुर्दशी एकत्र आल्याने 26 मे 2025 हा दिवस ‘पितृकार्येषु अमावास्या’ म्हणून साजरा केला जाईल. हरिद्वार येथील पंडित श्रीधर शास्त्री यांच्या मते...
आपल्या हिंदू धर्मात वैदिक पंचांगानुसार अश्विन महिन्यात येणाऱ्या पितृ पक्षाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये रुष्ट झालेल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना सुख मिळावं यासाठी अनेक प्रकारचे विधी, पूजा, हवन, दानधर्म इत्यादी केले जातात. आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृ पक्षाचे दिवस खूप खास मानले जातात. वर्षात काही अशा तिथी असतात, ज्या दिवशी पूर्वजांसाठी कोणतंही कार्य केल्यास त्याचा लाभ मिळतो. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पितृ कार्येशु अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी धार्मिक कार्य केल्यास साधकांना विशेष लाभ मिळतो, असं मानलं जातं.
या दिवशी करा पूर्वजांसाठी पूजा
याबद्दल अधिक माहिती देताना उत्तराखंडमधील हरिद्वार येथील ज्योतिषाचार्य पंडित श्रीधर शास्त्री Local 18 शी बोलताना सांगतात की, पितृ पक्ष पूर्वजांच्या शांतीसाठी खूप विशेष असतो. या दिवसांमध्ये रुष्ट पूर्वजांना शांत करण्यासाठी आणि भूतलोकात भटकणाऱ्या पूर्वजांना मुक्ती मिळावी यासाठी धार्मिक विधी महत्त्वाचे आहेत. वर्षातील सर्व अमावस्येलाही पूर्वजांसाठी धार्मिक विधी करण्याचं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ महिन्यात पूर्वजांना मुक्ती देण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी एक विशेष दिवस येतो. सन 2025 मध्ये, 26 मे रोजी ज्येष्ठ महिन्याच्या चतुर्दशीला पितृ कार्येशु अमावस्या साजरी केली जाईल, जी पूर्वजांसाठी अत्यंत विशेष तिथी आहे.
advertisement
भूतलोकात भटकणाऱ्या पूर्वजांना मिळेल शांती
ते म्हणाले की, सन 2025 मध्ये चतुर्दशी ही 'विद्धा अमावस्या' आहे. त्यामुळे पितृ कार्येशु अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी पूर्वज संबंधित विधी, पिंडदान, तर्पण, जलांजली, तिलांजली, दान इत्यादी पूर्वजांसाठी केल्यास भूतलोकात भटकणाऱ्या पूर्वजांना शांती मिळेल आणि त्यांना मोक्षही प्राप्त होईल. या दिवशी पूर्वज संबंधित धार्मिक विधी, पूजा, हवन, यज्ञ, दान इत्यादी केल्यास अश्विन महिन्यातील पितृ पक्षासारखंच फळ मिळतं, अशी धार्मिक मान्यता आहे.
advertisement
हे ही वाचा : 84 लाख योनी म्हणजे काय? मनुष्य जन्म कधी मिळतो? पद्म पुरणात दडलंय यामागचं रहस्य, वाचा सविस्तर...
हे ही वाचा : गृहस्थ असूनही संन्यासी होता येतं का? धर्मशास्त्र काय सांगतं? तज्ज्ञांनी सांगितली 'ही' महत्त्वाची गोष्ट
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 7:57 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
'या' दिवशी करा पितृकार्य! रुष्ट पूर्वज होतील शांत आणि देतील आशीर्वाद; ग्रहदोष होतील दूर