Weather Update: अरबी समुद्रातल्या वाऱ्यांनी बदलली दिशा, समुद्र खवळला ५ दिवस हवामानात मोठे बदल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather Update: विकेण्डला हवापालट! थंडी वाढणार की कमी होणार? हवामान विभागाने 5 दिवसांचे दिले अपडेट
उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तरेकडून येणारी बोचरी थंडी महाराष्ट्रालगतच्या सीमारेषेलगतच्या गावांमध्ये देखील पसरली आहे. महाराष्ट्रातील हवामानात आगामी काही दिवस फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि शेजारील राज्यांमधील शीत लहरींचा अंशतः परिणाम राज्याच्या काही भागांत जाणवू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अरबी समुद्रातील स्थिती आणि मच्छिमारांना इशारा: दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि केरळ किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Cyclonic Circulation) निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून अरबी समुद्रातील काही भाग खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस मच्छिमारांनी अरबी समुद्रातील सूचित केलेल्या क्षेत्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
महाराष्ट्रात उत्तर भारतासारखे 'दाट धुके' नसले तरी, पहाटेच्या वेळी काही भागांत हलके धुके पाहायला मिळू शकते. मात्र, याचा रेल्वे किंवा विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. उत्तर भारतात २० ते २२ डिसेंबर दरम्यान 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तिथे होणारी बर्फवृष्टी आणि कडाक्याची थंडी यामुळे उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे२५ डिसेंबरच्या सुमारास तापमानात अल्पशी घट होऊ शकते.









