मंदिर नसून ही पूर्वीच्या काळातील गढी आहे
काळाराम मंदिरातील वैदही उपासने यांनी लोकल 18 ला मंदिराची माहिती दिली. तेव्हा त्या सांगतात की, हे मंदिर कमीत कमी 450 वर्ष जुने असल्याची माहिती आहे. या मंदिराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करणारे श्री गागा भट्ट स्वामी महाराज यांच्या शिष्याने केल्याची आमचे पूर्वज सांगतात. आता याला आपण मंदिर म्हणतो. पण, हे मंदिर नसून गढी आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा अनेक लोकं चार धामची यात्रा करत होते. तेव्हा त्यांना पायी चालावं लागतं होतं किंवा मग बैलगाडीने जावं लागत होतं. त्यामुळे त्यांना मधात कुठे तरी विसावा घेण्यासाठी जागा पाहिजे होती. तेव्हा ही गढी बांधून यात मूर्तीची स्थापना करण्यात आली.
advertisement
शनीची साडेसाती म्हटलं की भल्याभल्यांना फुटतो घाम! कारण काय अन् काय करावेत उपाय? सविस्तर
गढीच्या देखभालीसाठी कुटुंबाची नेमणूक
गढी बांधल्यानंतर तेथील देखभाल करण्यासाठी एक कुटुंब नेमले जात होते. त्याचबरोबर यात्रेसाठी येणाऱ्या वाटसरुंच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे काम सुद्धा त्या कुटुंबाकडे देण्यात येत होते. तर अमरावतीमध्ये आमचे उपासने कुटुंब नेमल्या गेले होते. तेव्हा नेमलेल्या कुटुंबाला एक टोकण देण्यात होते. ते कॉइनसारखे दिसत होते. त्याचा वापर हा बाजारातील वस्तू मिळवण्यासाठी केला जात होता. ते टोकण दाखविले की, किराणा सामान मोफत मिळत होते. त्याच सामन्यातून वाटसरुंची देखभाल करावी लागत होती, असे वैदही यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिराला 1 रुपया मिळत होता
पुढे वैदही सांगतात की, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कारंजा लुटून परत जात होते. तेव्हा त्यांनी येथील तत्कालीन राजाला आदेश दिले होते की, आजूबाजूच्या सर्व मंदिराला त्याच्या कार्यक्रमासाठी वार्षिक 1 रुपया देण्यात यावा. तेव्हा या मंदिराला अचलपूर येथून 1 रुपया येत होता, असे आमचे पूर्वज सांगतात. त्यातून उत्सव साजरा केला जायचा. आताही लोकांच्या मदतीने उत्सव पार पाडत आहे.