त्रिशुंड गणपती मंदिराची स्थापत्यशैली पुण्यातील इतर कोणत्याही मंदिरापेक्षा वेगळी आणि लक्षवेधी आहे. वेरूळच्या लेण्यांप्रमाणे कोरीव शिल्पांनी सजलेली ही वास्तू शिवमंदिराच्या रचनेवर आधारित आहे. महाराष्ट्रात दुर्मिळ असलेली तीन सोंडांची गणेशमूर्ती या मंदिरात आहे. मंदिराच्या स्थापनेमागे 26 ऑगस्ट 1754 रोजी इंदूरजवळील धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरीजी यांचे योगदान आहे.
advertisement
मंदिराच्या विश्वस्त विश्वास स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तळघरात एक जिवंत झरा आहे. त्यामुळे तळघरात नेहमीच अडीच ते तीन फूट पाण्याचा साठा असतो. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर स्वच्छ करून ते भाविकांसाठी खुले केले जाते. या ठिकाणी गणपतगिरी गोसावी यांची समाधी असून, गणेश पूजेच्या वेळी त्या पवित्र पाण्याचा प्रभाव समाधीवर देखील जाणवतो.
गोसावी समाजाच्या मोठ्या वस्तीमुळे हे मंदिर सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. मंदिराच्या स्थापनेत गणपतगिरी गोसावी आणि निमगिरी गोसावी यांचे योगदान असून, ही परंपरा आजही अखंड सुरु आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला आहे.