ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर
बीड शहरातून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर महाराष्ट्रतच नव्हे तर भारतामधील एकमेव जलकुंडात असणारे महादेवाचे मंदिर आहे. श्रावण मासात या मंदिराला जत्रेचेच रूप येते. संपूर्ण महाराष्ट्रातून कंकालेश्वराच्या दर्शनासाठी भक्त येत असतात. या मंदिराची कलाकुसर आणि मंदिरामध्ये असणारी महादेवाची पिंड पाहण्यासाठी भाविक आवर्जून येतात.
advertisement
Video : सोमवारीच आलीये नागपंचमी; घरी पूजा केली तरी तितकाच फायदा मिळतो का?
श्रावण मासात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्रावण महिन्यात देशभरातील शिवमंदिरात गर्दी असते. कंकालेश्वर मंदिरात या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावण मासात कंकालेश्वर मंदिर सकाळी 5 वाजता भाविकांसाठी खुले होते. या ठिकाणी फुलांच्या माळांची सजावट करून महाआरती पार पडते. त्यानंतर भाताचा महाप्रसाद या ठिकाणी महादेवाला दाखवला जातो आणि दुपारच्या सुमारास महाआरतीचे आयोजन केले जाते. या महाआरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. या महाआरती दरम्यान महादेवाला पुरणाचा प्रसाद दाखवला जातो.
श्रावण महिन्यात मंदिर परिसरात जत्रेचे रूप येते. या ठिकाणी आठ दिवस संगीत सप्ताहाचे आयोजन देखील केले जाते. त्यानंतर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कीर्तन भजन देखील होतात. त्यामुळे संपूर्ण मंदिराचा परिसर हा भक्तिमय होतो. श्रावण महिन्यात महापंगतीचे देखील आयोजन केले जाते.