Video : सोमवारीच आलीये नागपंचमी; घरी पूजा केली तरी तितकाच फायदा मिळतो का?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
यंदा श्रावणातील सोमवारीच नागपंचमी आली आहे. त्यामुळे शिवपूजा मंदिरात करावी की घरात?
डोंबिवली, 19 ऑगस्ट: श्रावण महिन्यात शंकराची उपासना केली जाते. या महिन्यात शंकराच्या देवळात गर्दी असल्याने अनेक जण घरातूनच पूजा करण्यास प्राधान्य देतात. मात्र देवळात जाऊन पूजा केली तर आजूबाजूच्या लहरीमध्ये अधिक ऊर्जा असल्याने फळ अधिक मिळते. यंदा श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र आली असून या पूजेचा लाभ अधिक मिळेल, असे डोंबिवलीतील गुरुजी प्रदीप जोशी सांगतात.
कशी करावी शिवपूजा?
देवळात पूजा करताना सर्वात प्रथम देवाला नमस्कार करून आवाहन करावे. त्यानंतर जलाभिषेक आणि दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर गंध, अक्षदा आणि बेल पत्र शंकराला अर्पण करावे. शंकराची पिंड ही शंकर पार्वतीचे मनोमिलन असल्याचे गुरुजींनी सांगितले. शाळूंकी हे पार्वतीचे स्वरूप आहे. त्यामुळे शाळूंकीवर हळद कुंकू वहावे. नागाची पूजा करावी. नगदेवतेचे स्मरण करावे. गंध लावावे. एखादे केवड्याचे पान किंवा सुगंधी पुष्प नागाला अर्पण करावे असे गुरुजींनी सांगितले.
advertisement
असा करावा अभिषेक
महादेवाला जलाभिषेक किंवा दुधाच्या अभिषेकाचे महत्त्व आहे. मात्र, मंदिरात आजकाल प्लॅस्टिकच्या पिशवीतून थेट महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. मात्र हा अभिषेक तांब्याच्या किंवा स्टीलच्या पात्राने करणे गरजेचे आहे, अशी माहिती गुरुजींनी दिली.
तर घरीच करावी पूजा
देवळात अशा पद्धतीने पुजा करणे शक्य नसल्यास घरी पूजा करावी आणि देवळात दर्शन मात्र घ्यावे. यामुळे केलेल्या व्रताचा लाभ अधिक मिळेल. घरात पूजा करताना, तुळशी जवळ पूजा करताना, देवळात पूजा करताना आणि एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीकिनारी पूजा करताना प्रत्येक वेळी हजार पटीने अधिक लाभ मिळतो, असे गुरुजींनी सांगितले.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
First Published :
August 19, 2023 1:19 PM IST