पारधची ही शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा उत्सव म्हणजे श्रद्धेचा आणि एकतेचा संगम आहे. रात्रीच्या शांततेत निघालेल्या या मिरवणुकीत तरुण, महिला आणि ज्येष्ठांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत नटलेले भाविक, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून केलेली आरती आणि दिव्यांनी उजळलेला परिसर यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. गावाबाहेर नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले आणि सासरी नांदणाऱ्या मुलींसह सर्वजण या महोत्सवासाठी गावात दाखल झाले होते.
advertisement
Astrology: शनिच्या राशीत राहु गोचर! झटक्यात बदलून जाणार या 5 राशींचे नशीब, अच्छे दिनाची सुरुवात
'दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी महोत्सव आणि महादेवाची स्वारी अतीव उत्साहात पार पडली. ही परंपरा आमच्या गावचा आत्मा आहे', असे भाविक गजानन पाखरे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीने पारध आणि आसपासचा परिसर भक्तिमय करून टाकला. शांततेत आणि आनंदात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव दिला. पारधचा हा उत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिकतेचा एक अनोखा मिलाफ आहे.