TRENDING:

अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीवर कसा होतो सूर्यकिरणांचा अभिषेक? पाहा Video

Last Updated:

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीवर वर्षानुवर्षे अशाच प्रकारचा सूर्यकिरणांचा अभिषेक होत आलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : आयोध्यातील राम मंदिर उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर रामलल्लांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. त्या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराशी देखील या राम मंदिराचे एक वेगळे कनेक्शन असणार आहे. राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्याभिषेक करण्याचे नियोजित आहे. मात्र कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीवर वर्षानुवर्षे अशाच प्रकारचा सूर्यकिरणांचा अभिषेक होत आलेला आहे.

advertisement

कोल्हापूर येथील अंबाबाई देवीचे हे पुरातन मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली अंबाबाई देवीची 3 फूट उंच सुंदर अशी मूर्ती आहे. संपूर्ण मंदिराच्या बांधकामावेळी दिशांचा योग्य अभ्यास करून हवा-प्रकाशाचा अप्रतिम मेळ साधण्यात आला आहे. त्यामुळे हे मंदिर म्हणजे उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे. दरवर्षी वर्षांतून फक्त दोन वेळा काही दिवस या मंदिरात किरणोत्सव होत असतो. ज्यामध्ये सूर्याची मावळतीची किरणे देवीच्या मूर्तीवर पडतात. त्यातही विशेष बाब म्हणजे या किरणोत्सवाच्या दिवसांव्यतिरिक्त अन्य दिवशी सूर्यकिरणे मंदिरात येत नाहीत.

advertisement

व्यापारी वर्गाला होणार विशेष लाभ; वृश्चिक राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video

कसा पार पडतो किरणोत्सव सोहळा

अंबाबाई मंदिरात पार पडणाऱ्या या किरणोत्सव सोहळ्याबद्दल विवेकानंद महाविद्यालयातील खगोशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली आहे. ते या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याचा गेली कित्येक वर्षे अभ्यास करत आहेत. अंबाबाई मंदिराचे स्थापत्यशास्त्र हे अत्यंत अद्भुत आहे. किरणोत्सव पार पडण्याच्या दृष्टीने योग्य पद्धतीने या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. दिशा, खगोलशास्त्र आणि मंदिराचे स्थापत्य यांचा योग्यरित्या मेळ घालण्यात आल्याचे या निमित्ताने दिसून येते. या किरणोत्सव सोहळ्यावेळी सूर्याची मावळतीची किरणे ही मंदिराच्या महाद्वारापासून आत येतात. तेथून मंदिरातील गरुड मंडप, पुढे गणपती मंदिर चौक, कासव चौक, पितळी उंबरठा, खजिना गृह, गर्भ गृह, गर्भ कुटी असा जवळपास 70-80 मीटरचा प्रवास करुन ही किरणे देवीच्या मूर्तीवर विसावत असतात, अशी माहिती डॉ. कारंजकर यांनी दिली आहे.

advertisement

वर्षातून 2 वेळा होत असतो किरणोत्सव

मंदिरात उत्तरायण आणि दक्षिणायन अशा दोन वेळा किरणोत्सव सोहळा पार पडत असतो. यापैकी दक्षिणायन कालखंडात पार पाडणारा किरणोत्सव हा 9 नोव्हेंबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत होत असतो. यातील 9 तारखेला सूर्यास्ताची किरणे देवीच्या चरणांपर्यंत येतात. 10 तारखेला किरणे देवीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत येतात. यानंतर 11 देवीच्या चेहऱ्यावर आणि 12 तारखेला ही किरणे देवीच्या खांद्यापर्यंत येतात. शेवटी 13 तारखेला सूर्यकिरणे देवीचे चरणस्पर्श करुन उजव्या बाजूने लुप्त होतात. त्याचप्रमाणे उत्तरायण कालखंडात 29 जानेवारीपासून 02 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा होत असतो. यातील 29 तारखेला सूर्यास्ताची किरणे देवीच्या चरणांपर्यंत येतात. 30 तारखेला किरणे देवीच्या कंबरेपर्यंत येतात. यानंतर 31 जानेवारी पूर्ण चेहऱ्यावर आणि 01 फेब्रुवारी तारखेला ही किरणे देवीच्या खांद्यापर्यंत येतात. शेवटी 02 तारखेला सूर्यकिरणे देवीचे चरणस्पर्श करुन मग डाव्या बाजूने लुप्त होतात, असे डॉ. कारंजकर यांनी सांगितले. 

advertisement

आर्थिक परिस्थिती सुधारायला होईल मदत; कुंभ राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video

योध्येत देखील असाच सूर्याभिषेक होणार

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणेच आयोध्येतील राम मंदिरात देखील प्रभु श्रीरामांच्या मूर्तीवर वर्षातून एकदा सूर्याभिषेक करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी मंदिरात शास्त्रज्ञांनी बनवलेले 'सूर्य तिलक तंत्र' हे लेन्स आणि आरशावर आधारित उपकरणग गर्भगृहात आणि तळमजल्यावर बसवण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी केवळ रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजून 6 मिनिटांपर्यंत सूर्यकिरणे रामलल्लांच्या मूर्तीच्या डोक्यावर पडतील. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे 'सूर्य टिळक तंत्र' पूर्ण प्रभावीपणे काम करेल.

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीवर कसा होतो सूर्यकिरणांचा अभिषेक? पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल