आर्थिक परिस्थिती सुधारायला होईल मदत; कुंभ राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आता जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरु झाला आहे. कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल? पाहा
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : कुंभ राशी ही राशी चक्रातली अकरावी रास आहे. आता जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकजण मासिक राशीभविष्य पाहात असतात. त्यामुळे कुंभ या राशीच्या मंडळीसाठी 2024 या वर्षातला फेब्रुवारी महिना कसा जाईल? याबाबत वर्ध्यातील ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी माहिती दिली आहे.
आव्हानांचा कराल सहज सामना
कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी फेब्रुवारीचा हा महिना मिळते जुळते परिणाम घेऊन येणार आहे. सर्वात चांगली गोष्ट ही राहील की, तुमचा राशी स्वामी शनी महाराज तुमच्याच राशीमध्ये पूर्ण महिना कायम राहील. यामुळे तुम्हाला किती ही आव्हानांचा सामना करावा लागला तर तुम्ही करू शकतात आणि त्यातून ही बाहेर निघू शकाल. तुम्ही आपल्या अनुशासनाला महत्व द्याल आणि आपल्या उत्तम दिनचर्येने आपल्या सर्व कामांना वेळ राहताच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतांना दिसाल. यामुळे तुमचे निजी आणि पेशावर जीवन संतुलित राहील, असे शर्मा सांगतात.
advertisement
धार्मिक यात्रेचे योग
या महिन्यात धार्मिक यात्रेचे योग बनतील. मनात धर्म-कर्माचे विचार येतील. स्वास्थ्य प्रति थोडी सावधानी ठेवण्याची आवश्यकता असेल. कुटुंबातील लोकांचे सहयोग प्राप्त होईल. कमाईमध्ये वाढीसोबतच खर्चात तेजी राहील. करिअरसाठी वेळ उत्तम राहणार आहे. आपल्या स्वभावाला उत्तम बनवण्याचा प्रयत्न केल्याने आणि क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास काम होतील. जर तुम्ही प्रेम संबंधात आहेत तर महिन्याची सुरुवात चांगली राहील. मंगळ आणि शुक्र दोघांचा सम्मिलीत प्रभाव तुमच्या पंचम भावावर राहून तुम्हाला खूप रोमँटिक बनवेल.
advertisement
आर्थिक परिस्थिती सुधारेल
जर तुमच्या आर्थिक स्थितीला पाहायचे झाले तर महिन्याची सुरुवात अनुकूल राहील. दुसऱ्या भावात राहू आणि एकादश भावात मंगळ शुक्राच्या स्थितीच्या कारणाने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वृद्धी होईल. तुमची कमाई वाढेल. हा महीना स्वास्थ्य दृष्टिकोणाने चढ-उताराचा राहणार आहे. शनी महाराज तुमच्या राशीचा स्वामी असून तुमच्याच राशीमध्ये स्थित राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्वास्थ्य प्रदान करेल. उपाय तुम्ही शनिवारी दशरथकृत शनी स्तोत्राचे पाठ केले पाहिजे.
advertisement
जमीन खरेदीची संधी, पण गुंतवणूक करताना.., पाहा कन्या राशीचे फेब्रुवारीतील मासिक भविष्य, Video
कुंभ राशीच्या मंडळींसाठी फेब्रुवारी महिना हा काहीसा मिश्र फलदायी असणार आहे. या महिन्यात या मंडळींना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच धार्मिक यात्रेचे योग देखील असल्याचं सांगितलं गेलंय. कुटुंबाची साथ असेल मात्र आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या महिन्यात कुंभ राशीच्या मंडळींना उपाय म्हणून शनी महाराजांची उपासना,तेल अर्पण करून पूजा आणि मंत्र जप करण्याचा सल्ला ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी दिलाय.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
February 01, 2024 1:25 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
आर्थिक परिस्थिती सुधारायला होईल मदत; कुंभ राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video

