कार्तिक स्वामींचे एकच मंदिर
जालना जिल्ह्यात कार्तिक स्वामींचे एकच मंदिर आहे. शहरातील बडी सडकला असलेल्या श्रीराम मंदिरापाशी हे मंदिर स्थित आहे. वर्षातील 365 दिवस हे मंदिर बंद असते. कार्तिक स्वामींच्या मूर्तीसमोर पडदा टाकलेला असतो. केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मूर्ती समोरील पडदा हटवण्यात येतो. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शहरातील स्त्री पुरुष मोठ्या भक्ती भावाने आणि श्रद्धेने कार्तिक स्वामींचे दर्शन घेतात त्यांची आराधना करतात. कार्तिक स्वामींचे वाहन मोर असल्याने भाविक या ठिकाणी मोरपंख घेऊन कार्तिक स्वामींना अर्पण करतात. या दिवशी कार्तिक स्वामींची मनोभावे पूजाअर्चा केल्याने जीवनात भरभराट होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
Spirituality: अशा विशिष्ट रचनेचा नारळ सापडला तर जपून ठेवा, लाखात असं एक सापडतं श्रीफळ
मी मागील पन्नास वर्षांपासून या ठिकाणी पूजा अर्चा करतो. जालना शहरात कार्तिक स्वामींचे हे एकमेव मंदिर आहे हे मंदिर जवळपास अडीचशे ते तीनशे वर्ष जुनं आहे. पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा अर्चा केल्याचं विशेष महत्त्व असतं. यामुळे जालना शहरातील स्त्री-पुरुष या दिवशी आवर्जून या ठिकाणी येतात आणि मोरपंख अर्पण करून आपल्या मनातील मनोकामना कार्तिक स्वामी पुढे प्रकट करतात. कार्तिक स्वामींचे वाहन मोर असल्याने मोरपंख अर्पण करून विशेष पूजा अर्चा केल्याने आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, असं मंदिराचे पुजारी शिवकुमार रामकुमार श्रीमाळी यांनी सांगितलं.