Spirituality: अशा विशिष्ट रचनेचा नारळ सापडला तर जपून ठेवा, लाखात असं एक सापडतं श्रीफळ

Last Updated:

Spirituality: वास्तविक सर्वच नारळ हे श्रीफळ नसतात. फक्त एकाच विशिष्ट प्रकारच्या नारळाला श्रीफळ म्हणतात, जो श्री म्हणजेच लक्ष्मीचा दाता मानला जातो. हजारो किंवा लाखो नारळांमध्ये एक असा श्रीफळ सापडतो.

News18
News18
मुंबई, 29 नोव्हेंबर : हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. पूजेनंतर प्रसादाच्या स्वरूपात किंवा भेटवस्तू म्हणूनही नारळ हा पूजाविधीचा एक महत्त्वाचा भाग आहे. नारळाला श्रीफळ देखील म्हणतात आणि सामान्यतः लोक सर्व नारळांना श्रीफळ संबोधतात, परंतु हा गैरसमज आहे. वास्तविक, सर्वच नारळ हे श्रीफळ नसतात. फक्त एकाच विशिष्ट प्रकारच्या नारळाला श्रीफळ म्हणतात, जो श्री म्हणजेच लक्ष्मीचा दाता मानला जातो. हजारो किंवा लाखो नारळांमध्ये एक असा श्रीफळ सापडतो. सर्व नारळ शुभ असतात पण (एकाक्षी) एकमुखी नारळ हा लक्ष्मीचा दाता आहे, असे म्हटले जाते आणि ज्याच्याकडे असेल त्याला धन-दौलत कधी कमी पडत नाही.
एकाक्षी नारळ म्हणजे काय?
नारळाची शेंडी काढली तर तळाशी तीन छिद्रे दिसतात. या तीन छिद्रांपैकी दोन छिद्रांना डोळे आणि एकाला नारळाचे तोंड म्हणतात. अशा प्रकारच्या नारळात तीन उभ्या रेषा दिसतात. पण, एकाक्षी नारळात फक्त दोन छिद्रे असतात, त्यापैकी एक तोंड आणि एक डोळा मानला जातो. दिसायला आकाराने खूपच लहान आणि त्यात दोन उभ्या रेषा असतात. एकाक्षी नारळालाच श्रीफळ म्हटले जाते. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून अशा एकाक्षी नारळाला खूप मागणी आहे, पण तसा नारळ सापडणे अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे पैशाच्या लोभापोटी काही ठिकाणी बनावट एकाक्षी नारळ तयार करून विकले जातात.
advertisement
एकाक्षी नारळ कसा वापरायचा -
खरा एकाक्षी नारळ मिळाल्यास होळी, दिवाळी, सूर्य-चंद्रग्रहण, रवि-गुरु पुष्य नक्षत्र, अक्षय तृतीया, आवळा नवमी, दसरा, नवरात्री इत्यादी विशेष शुभ प्रसंगी त्याची षोडशोपचारात पूजा करून लाल रेशमी वस्त्रात बांधून ठेवा. त्यानंतर तो आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठान, दुकानात ठेवा किंवा घराच्या तिजोरीत ठेवा. पूजेच्या ठिकाणीही ठेवता येईल. यामुळे लक्ष्मीची पूर्ण कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
एकाक्षी नारळाचे फायदे -
एकाक्षी नारळामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. ज्या घरात असा नारळ असतो, ते घर सुख आणि संपत्तीने भरलेले असते.
हा नारळ वैवाहिक सुख देणारा आहे, असे म्हणतात. घरात असल्यास पती-पत्नीमध्ये प्रेम कायम राहते.
advertisement
एकाक्षी नारळामुळे नऊ ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळते. कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात.
एकाक्षी नारळाचा उपयोग संमोहन आणि वशिकरणातही केला जातो. ज्याच्याकडे हा नारळ आहे तो सर्वांना आकर्षित करतो.
व्यवसायाच्या कामात किंवा नोकरीत काही अडथळे येत असतील तर एकाक्षी नारळाची पूजा करून अडथळा दूर होतो.
ज्या व्यक्तीकडे असा नारळ असतो, त्याला कोणीही हानी पोहोचवण्यासाठी केलेल्या तंत्र-मंत्र प्रयत्नांचा उपयोग होत नाही.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Spirituality: अशा विशिष्ट रचनेचा नारळ सापडला तर जपून ठेवा, लाखात असं एक सापडतं श्रीफळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement