Shani Tips: अशा व्यक्तींना त्रास देणं पडू शकतं महागात; वाईट शिक्षा देतात शनिदेव

Last Updated:

Shani angry upay: शनिदेव कोपतात तेव्हा माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शनिदेव नाराज होऊ नयेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. परंतु, काही वेळा

News18
News18
मुंबई, 02 ऑगस्ट : नवग्रहांमध्ये शनीला विशेष महत्त्व दिलं जातं. शनीची साडेसाती आणि अडीचकी यांविषयी भीती पाहायला मिळते. शनी हा ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्या व्यक्ती जीवनात चांगलं काम करतात, त्यांना चांगलं फळ मिळतं. त्याउलट, ज्या व्यक्ती जीवनात वाईट कृत्यं करतात, इतरांना त्रास देतात, फसवणूक करतात त्यांच्यावर शनीची वक्रदृष्टी राहते. याचा अर्थ जी व्यक्ती इतरांना मदत करते, खोटं बोलत नाही किंवा कोणाचीही फसवणूक करत नाही, त्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपादृष्टी होते.
शनीला न्यायाची देवता म्हणतात. शनिवार हा शनीचा वार मानला जातो. शनिवारी शनिदेवाची विधिवत पूजा केल्यास शुभ फळ मिळतं, असं मानलं जातं. शनिदेव कोपतात तेव्हा माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शनिदेव नाराज होऊ नयेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. परंतु, काही वेळा जाणूनबुजून किंवा नकळत एखादी व्यक्ती असं काम करते ज्यामुळे शनिदेव नाराज होतात. एखाद्या पीडित व्यक्तीला विनाकारण त्रास देण्यासारखी कृत्यं केल्याने शनिदेव क्रोधित होतात. परिणामी संबंधित व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. कोणत्या व्यक्तींचा छळ केला किंवा त्यांना त्रास दिल्यास शनिदेव कोपतात, ते ज्योतिषाचार्य पंडित गोविंद पांडे यांच्याकडून जाणून घेऊ या.
advertisement
या व्यक्तींना त्रास देणं पडू शकतं महागात
कमकुवत व्यक्ती, महिला किंवा नोकरांना त्रास देणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कोपतात. अशा व्यक्तींना न्यायदेवता शनी शिक्षा करतात. अशा कमकुवत व्यक्तींना कधीही त्रास देऊ नये, त्यांना मदत करावी. अशा व्यक्तींना मदत करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव विशेष कृपा करतात.
advertisement
फसवणूक करणाऱ्यांवरही शनिदेव होतात नाराज
इतरांची फसवणूक करणाऱ्या किंवा धोका देणाऱ्यांवर शनिदेवाची वक्रदृष्टी असते. अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना शनिदेव सोडत नाहीत. त्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा मिळते.
लोकांना नावं ठेवणाऱ्यांवर कोपतात शनिदेव
याशिवाय, ज्या व्यक्ती पाठीमागे इतरांबद्दल वाईट बोलतात आणि खोटं बोलतात त्यांच्यावरही शनिदेवाचा कोप होतो. अशा व्यक्तींची इच्छा असूनही प्रगती होत नाही. अशा व्यक्तींना शनिदेव कर्मानुसार शिक्षा देतात. अशा व्यक्ती आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक कलहामुळे त्रस्त असतात.
advertisement
पशु-पक्ष्यांना त्रास देणं टाळा
पशु-पक्ष्यांना त्रास दिल्यास शनिदेवाचा कोप होतो. पशु-पक्ष्यांवर अत्याचार करणाऱ्यांना शनिदेव कधीच माफ करत नाहीत. अशा व्यक्ती याच जन्मात शनिदेवाच्या वक्रदृष्टीच्या बळी ठरतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani Tips: अशा व्यक्तींना त्रास देणं पडू शकतं महागात; वाईट शिक्षा देतात शनिदेव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement