गेल्या 20 वर्षांपासून मुंबईतील आय स्मार्ट कंपनीच्या वतीने मंदिराच्या स्वच्छतेची सेवा मोफत दिली जाते. गुरुवारी सकाळी 25 जणांच्या टीमचे कोल्हापुरात आगमन झाले. अंबाबाई मंदिरात सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या मशिनरींचे पूजन झाले. त्यानंतर मूळ स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ झाला. पुढील 8 दिवसांत संपूर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात येणार आहे.
advertisement
41 हजारांचा नारळ अन् 20 हजारांची कोथिंबीर जुडी! या गावात पार पडला अनोखा लिलाव, एवढं महाग का?
बुधवारी दर्शन बंद
आय स्मार्ट कंपनीकडून बुधवारी देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असून या दिवशी एकादशी आहे. याच स्वच्छतेच्या कामामुळे देवाच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवीच्या खजिन्यात दीड कोटींची भर
अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांतील रकमेची मोजदाद गेल्या चार दिवसांपासून सुरू होती. ती गुरुवारी पूर्ण झाली. यामध्ये गेल्या दीड महिन्यात देवीच्या खजिन्यात दीड कोटींचे दान वाढली आहे. अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात 1 कोटी 56 लाख 84 हजार 533 रुपयांची भर पडली आहे. सर्वाधिक दान हे 2 नंबरच्या पेटीत आले असून यामध्ये 44 लाख 68 हजार रुपये निघाले आहेत.