धाराशिव: शिवयोगी श्री मन्मथ स्वामी हे लिंगायत सांप्रदायातील महान संत झाले. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हाडोंग्री परिसराती त्यांनी तपश्चर्या केली. वनराईने नटलेल्या याच शिवकडा परिसरात प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिराचा परिसर निसर्ग संपन्न असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
संत मन्मथ स्वामींची तपश्चर्या
श्री संत मन्मथ स्वामी हे लिंगायत धर्माचे संत तसेच शिवयोगी होते. लिंगायत श्री संत नागनाथ मरळसिद्ध यांचे हे शिष्य होते. शिवकडा या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. तर कपिलधार येथे मन्मथ स्वामींची समाधी आहे. बालपणापासूनच मन्मथ स्वामी यांना मराठी काव्याची आवड होती आणि त्यांचा ओढा मराठी काव्यरचनेकडे होता. युवा अवस्थेच्या आरंभापासूनच त्यांनी लोककाव्य निर्माण करण्याच्या प्रयासाला आरंभ केला होता, अशी माहिती पुजारी शांतलिंग साखरे यांनी दिली.
advertisement
अमावस्येला मराठवाड्यात गावं ओस का पडतात? काय आहे नेमकं कारण? Video
विविध ग्रंथांची निर्मीत
संत मन्मथ स्वामी यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. स्वयंप्रकाश, ज्ञानबोध, गुरु गीता, शिवगीता, श्री परमरहस्य आदी ग्रंथ त्यांनी लिहिले. शिवयोगी श्री संत मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला श्री परमरहस्य हा ग्रंथ वीरशैव लिंगायत धर्मातील एक पवित्र तसेच महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात मन्मथ स्वामींनी वीरशैव लिंगायत धर्मातील शिवाचार, शिवसंस्कृती, शिवधर्म याबद्दल विस्तृत असे विवेचन केलेले आहे. तर वीरशैव लिंगायत धर्मातील अनुयायी या ग्रंथाचे नियमित पारायण करतात. तसेच मन्मथ स्वामी यांनी शिवकडा येथे तपश्चर्या केल्याने ही भूमी पवित्र मानली जाते. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते