पापासॉर्ण मिपा म्हणाल्या, भारतीयांना आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या कार्याला मदत देण्याच्या उद्देशाने या रुग्णवाहिका मी देत आहे. ट्रस्ट गोरगरीब वंचितांना मदत देण्यासोबत विविध रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्यसेवा देत आहे. आमचे देखील भाग्य आहे की आम्ही ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचा या माध्यमातून छोटासा भाग होऊ शकलो.
7 पुणेकरांची सायकलवारी, 8 दिवसांत गाठली कन्याकुमारी
advertisement
थायलंडमध्ये उभारतायेत गणेश मंदिर
पापासॉर्ण मिपा या साध्या पत्र्याच्या घरात वास्तव्यास होत्या. मात्र, गणरायाच्या कृपेने आज त्यांची फुकेत मधील यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख आहे. फुकेत 9 रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी ही त्यांची कंपनी आहे. गणरायाच्या कृपेने यश मिळाल्याने फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासारखे मंदिर उभारत आहेत. बांधकाम क्षेत्रात त्यांना मिळालेले यश हे दगडूशेठ गणेशामुळेच मिळाले, असल्याची भावना त्यांनी पुण्यात व्यक्त केली. थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे, मात्र अंतर खूप असल्याने शक्य होत नाही. याकरिता मी फुकेत येथे मंदिर उभारत आहे, असे त्यांनी सांगितले.
दगडूशेठ गणपती ट्रस्टची आरोग्यसेवा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान राबवत आहे. या अंतर्गत भारती हॉस्पीटल रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जय गणेश प्रांगण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.





