TRENDING:

महिला मंदिरात का फोडत नाहीत नारळ? जाणून घ्या खरं कारण Video

Last Updated:

नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 17 नोव्हेंबर : हिंदू धर्मात नारळाला अत्यंत महत्व आहे. नारळ कोणत्याही शुभ प्रसंगी पूजला जातो आणि नारळ देवाची पूजा करून फोडला जातो. कोणत्याही देव-देवतांच्या पूजेसाठी नारळ हा लागतोच. नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात. पण महिला पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो. यामागे नेमकं कारण काय आहे याबद्दलच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे.
advertisement

महिला मंदिरात का फोडत नाहीत नारळ? 

महिला नारळ फोडत नाही, त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे, त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात. अगदी त्याचाच संबंध नारळाशी लावला गेला. म्हणूनच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही, अशी माहिती राजेश जोशी यांनी दिली. 

advertisement

तुळशी विवाहाला करावे 'हे' उपाय; मिळेल मनासारखा जाेडीदार

असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला. या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळात तीन डोळे बनतात, या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते. म्हणून त्याला स्त्रीया हात लावत नाहीत, असं राजेश जोशी यांनी सांगितलं. 

advertisement

चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुळस, अन्यथा होतात वाईट परिणाम!

यामागे अशी एक कहाणी देखील सांगितली जाते की, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो. नारळ हे भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही, असंही राजेश जोशी यांनी सांगितलं. 

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महिला मंदिरात का फोडत नाहीत नारळ? जाणून घ्या खरं कारण Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल