तुळशी विवाहाला करावे 'हे' उपाय; मिळेल मनासारखा जाेडीदार

Last Updated:

लग्न जुळण्यात अडचणी येत असतील, मनासारखा जाेडीदार मिळत नसेल तर तुळशीच्या लग्नाला उपाय करण्याचा सल्ला ज्याेतिषांनी दिला.

शुक्रवारी, 24 नाेव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाईल.
शुक्रवारी, 24 नाेव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाईल.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयाेध्या, 16 नोव्हेंबर : सणांच्या दृष्टीने कार्तिक महिना अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाताे. या काळात येणारी एकादशी तिथी विशेष असते. तिच्या पुढील दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात हाेते. याच दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशीचं लग्न भगवान शालिग्राम यांच्याशी लावलं जातं. जाणून घेऊया, कधी आहे तुळशी विवाह आणि त्यानिमित्ताने काय करावे उपाय.
advertisement
अयाेध्येचे ज्याेतिषी पंडित कल्कि राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वादशी तिथी 23 नाेव्हेंबरला रात्री 9 वाजून 01 मिनिटांपासून सुरू हाेईल आणि 24 नाेव्हेंबरच्या संध्याकाळी 7 वाजून 06 मिनिटांनी संपेल. त्यामुळे शुक्रवारी, 24 नाेव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाईल.
लग्न जुळण्यात अडचणी येत असतील, मनासारखा जाेडीदार मिळत नसेल तर तुळशीच्या लग्नाला उपाय करण्याचा सल्ला ज्याेतिषांनी दिला. त्यांनी सांगितलं की, तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करावी. ही चुनरी दुसऱ्या दिवशी सांभाळून ठेवावी. असं केल्यास तुळशीच्या आशीर्वादाने अनुरूप जाेडीदार मिळेल.
advertisement
इतकंच नाही तर अख्ख्या हळदीची गाठ, केशर, गुळ आणि चना डाळ एका पिवळ्या कापडात बांधून ते विष्णू मंदिरात अर्पण करावं. यामुळे लवकरच विवाह याेग जुळण्याची शक्यता असते. तसंच अखंड साैभाग्य प्राप्तीसाठी तुळशीला साैभाग्याचे साहित्य अर्पण करावे. पूजेनंतर हे साहित्य साैभाग्यवती स्रीला दान करावे. असं केल्यास दाम्पत्य जीवनात सुख येतं आणि पती-पत्नीमध्ये प्रेम वाढतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुळशी विवाहाला करावे 'हे' उपाय; मिळेल मनासारखा जाेडीदार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement