TRENDING:

जेजुरीच्या खंडोबाची अद्भुत आख्यायिका, मल्लासुराचा केला होता वध, 200 पायऱ्या चढून भाविकांना मिळते दर्शन

Last Updated:

या मंदिराबाबत अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 11 ऑगस्ट: भारतात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत. त्यापैकी एक पुणे जिल्ह्यातील जेजुरीत आहे. ज्याचे नाव खंडोबा मंदिर आहे. हे अतिशय सुंदर मंदिर 718 मीटर उंचीवर एका छोट्या टेकडीवर बांधलेले आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांना सुमारे दोनशे पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिराबाबत अनेक कथा प्रसिद्ध आहेत.
News18
News18
advertisement

शास्त्रानुसार देवघरात अजिबात ठेवू नका या वस्तू, संकटांना ठरेल आमंत्रण

हे मंदिर खंडोबाला समर्पित आहे. ज्यांना मार्तंड भैरव आणि मल्हारी या नावानेही ओळखले जाते. हेदेखील भगवान शंकराचे दुसरे रूप आहे. मंदिरात स्थापित केलेली खंडोबाची मूर्ती घोड्यावर स्वार झालेल्या योद्ध्याच्या रूपात आहे.

खंडोबाने मातलेल्या मल्लासुराचे शीर कापून मंदिराच्या पायरीवर ठेवले. दुसरीकडे, मणीने मानवजातीच्या कल्याणासाठी देवाकडे वरदान मागितले होते. त्यानंतर देवाने त्याला जिवंत सोडले होते.

advertisement

भगवान खंडोबाला उग्र देवता म्हणतात. म्हणूनच त्याच्या पूजेचे नियमही खूप कडक आहेत. हे भव्य मंदिर दोन भागात विभागलेले आहे. त्यापैकी एकाला मंडप आणि दुसऱ्याला गर्भगृह असे म्हणतात. त्यात खंडोबाची मूर्ती बसवली आहे. हेमाडपंती शैलीत बांधलेल्या या मंदिरात पितळेचे एक मोठे कासवही आहे.

घरात फिश अॅक्वेरियम ठेवायचंय? मग वास्तुशास्त्राचा हा नियम नक्की पाहा

advertisement

याशिवाय या मंदिरात ऐतिहासिक दृष्टिकोनातून अनेक शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे दसऱ्याच्या दिवशी दातांच्या साहाय्याने अवजड तलवार जास्त वेळ तोलून धरण्याची स्पर्धा असते, जी बरीच प्रसिद्ध आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
जेजुरीच्या खंडोबाची अद्भुत आख्यायिका, मल्लासुराचा केला होता वध, 200 पायऱ्या चढून भाविकांना मिळते दर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल