भारतात ग्रहणाची वेळ आणि स्वरूप
भारतात हे ग्रहण अत्यंत कमी वेळेसाठी दिसणार आहे, कारण चंद्रोदयाच्या वेळीच ग्रहणाची सांगता जवळ आलेली असेल. खग्रास अवस्था दुपारी 4:34 ते 5:33 पर्यंत असेल. या वेळी भारतात चंद्र क्षितिजाखाली असेल. तर ग्रहणाची समाप्ती 6 वाजून 47 मिनिटांनी होईल. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये चंद्र उशिरा उदय होत असल्याने, हे दृश्य केवळ 3 ते 7 मिनिटांसाठीच पाहता येईल.
advertisement
चुकूनही करू नका 'या' 3 गोष्टी
धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण काळात पर्यावरणात नकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते, त्यामुळे या 3 गोष्टी टाळाव्यात. ग्रहणाच्या सूतक काळात अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे. वैज्ञानिकदृष्ट्या, ग्रहण काळात अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या अभावामुळे अन्नामध्ये जीवाणूंची वाढ वेगाने होते, ज्यामुळे ते पचण्यास जड किंवा विषारी ठरू शकते. ग्रहण काळात झोपणे अशुभ मानले जाते. तसेच, या काळात शारीरिक संबंध ठेवणे वर्ज्य आहे, कारण त्याचा नकारात्मक प्रभाव आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होतो, असे मानले जाते.
हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार?
हे खग्रास चंद्रग्रहण जगाच्या मोठ्या भागात दिसणार आहे. आजचे चंद्रग्रहण पूर्ण भारतभर विशेषतः आसाम आणि बंगालमध्ये जास्त काळ दिसेल. तर जगात संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि हिंद महासागराच्या क्षेत्रात हे ग्रहण स्पष्ट दिसेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
